Dr. Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Panjim Solar City: CM सावंत म्हणतात... पणजीत सौरऊर्जा पॅनलसाठी जागाच उपलब्‍ध नाही

धक्कादायक माहिती : एकूण विजेची 10 ते 20 टक्केच गरज भागणार

गोमन्तक डिजिटल टीम

Panjim Solar City गोव्‍याची राजधानी असलेल्‍या पणजीच्या एकूण विजेच्‍या गरजेपैकी केवळ 10ते 20 टक्के गरजच सौरऊर्जेद्वारे भागवता येणे शक्‍य आहे. छपरावर सौरऊर्जा निर्मितीचे पॅनल बसवण्यासाठी पुरेशी जागाच पणजीत नसल्याची धक्कादायक माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

गोवा ऊर्जा विकास यंत्रणेतर्फे आयोजित ‘पणजी सौरशहर : छपरावर सौरऊर्जा निर्मिती’ या विषयावरील कृतिसत्राच्या उद्‍घाटन सोहळ्यात मुख्‍यमंत्री बोलत होते. ते म्हणाले, पणजीची विजेची एकूण गरज १२८ मेगावॅट असून सरासरी २२ मेगावॅट वीज लागते.

सध्या केवळ अर्धा मेगावॅट सौरऊर्जा निर्मिती शहरात होते. त्यामुळे पूर्णतः पणजी शहर हे अपारंपरिक ऊर्जा वापरणारे शहर म्हणून पुढे आणायचे असल्यास सर्व ग्राहकांनी अशा ऊर्जेची खरेदी केली पाहिजे.

ऊर्जानिर्मिती करून ती ग्रीडला देणे आणि आवश्यक ती ऊर्जा परत घेणे हाही एक मार्ग त्यात असू शकतो. सौरऊर्जा निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार केंद्र सरकारच्या सहकार्याने सौर पॅनल बसवण्याच्या खर्चावर ५० टक्क्यांपर्यंत अनुदान देते. वाणिज्‍यीक आस्थापनांना २० टक्के अनुदान देण्‍यात येते, असे मुख्‍यमंत्री म्‍हणाले.

दरम्‍यान, पणजी शहर सौरशहर करण्यासाठी आर्थिक तरतूद नसल्याची माहिती नुकत्‍याच संपलेल्‍या विधानसभा अधिवेशनात देण्‍यात आली होती. त्यास आठवडा उलटण्याच्या आत हे कृतिसत्र घेण्यात आले, हे विशेष होय.

पणजी शहरात 15 किलोवॅट क्षमतेचे सौरवृक्ष बसवण्यासाठी 15 जागा निवडण्यात आल्या आहेत. असे सौरवृक्ष वाणिज्यीक आस्थापनांना पुरस्कृत केल्यास त्‍या आस्‍थापनांना विजबिलात सवलत देण्यात येईल.

भिंतीवर सौर पॅनल बसवण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध आहे. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर त्या तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले आहे. ते तंत्रज्ञान स्वीकारता येणे शक्य आहे.

- डॉ. प्रमोद सावंत, मुख्‍यमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Conservation: गोव्यात पाण्याची मोठी चिंता! 30 सप्टेंबरपर्यंत 500 बंधाऱ्यांचे दरवाजे बंद करण्याचा सरकारचा निर्णय; जलसंवर्धनासाठी उचलली पावले

Ganeshotsav 2026: गोव्यात गणेशोत्सवाचा जल्लोष सुरू! अंगणात सडा, दाराशी रांगोळी अन् माटोळीची सजावट; बाप्पाच्या आगमनाने चैतन्याला उधाण

Horoscope 14 September 2026: गणपती बाप्पा मोरया...! बाप्पाच्या कृपावर्षावानं 'या' राशी होणार मालामाल; कुबेराचा खजिना उघडणार

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

SCROLL FOR NEXT