Panjim Smart City Dainik Gomantak
गोवा

Panjim Smart City: आझाद मैदानाजवळ मालवाहक टेम्पो रुतला: स्मार्ट सिटीच्या खोदकामाचा वाहनचालकांना फटका

Panjim Smart City: स्मार्ट सिटी प्रकल्पाखाली पणजी शहरातल्या सांतिनेज तसेच इतर भागातही विविध कामे हाती घेण्यात आली असून जिथे तिथे रस्ते खोदून ठेवले आहेत.

Ganeshprasad Gogate

Panjim Smart City: राजधानी पणजीची स्मार्ट योजनेखाली निवड होऊनही गेल्या आठ-नऊ वर्षात अशी स्थिती झालेली आहे की त्यामुळे सरकारी यंत्रणाच तोंडघशी पडत आहेत.

2015 मध्ये कामाला सुरवात झालेल्या स्मार्ट सिटीबाबत अनुभव वेगळाच आहे. गेली सात -आठ वर्षे केवळ खोदकाम तेवढे सुरु आहे.

मागील वर्षभरात या खोदकामामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही बराच मनस्ताप सहन करावा लागलाय. रस्ता खचून वाहने अडकण्याच्या घटना तर कित्येकवेळा घडल्या आहेत.

आज सोमवारी आठवड्याच्या सुरुवातीलाच एक मालवाहक टेम्पो रस्ता खचल्यामुळे अडकून पडल्याची घटना घडली. सोमवारी सकाळच्या वेळेस आझाद मैदानाजवळ हा प्रकार घडल्याची माहिती समोर आलीय.

तर पणजीच्या सांतिनेज भागात दररोज ये-जा करणाऱ्या नागरिकांचा जणू सहनशीलतेचा अंतच पाहिला जात चित्र दिसत आहे. ख्रिश्चन समुदायाच्या स्मशानभूमीसमोर चेंबरचे काम सुरू आहे. चेंबरच्या खड्ड्यातून पाणी उपसा करून तो रस्त्यावरच सोडला जात आहे.

हे पाणी रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या खड्ड्यात जाऊन साचते. येथून चार चाकी वाहनांना त्यातून सहज मार्ग काढता येतो, परंतु दुचाकीस्वारांना व पादचाऱ्यांना जीव मुठीतच घेऊन ये-जा करावे लागतेय.

वास्तविक पाहता या सगळ्या प्रकाराबद्दल आता तर भाजपवालेही नाक मुरडत आहेत.पणजीचे आमदार असलेले आमदार तथा मंत्री बाबूश मॅान्सेरात यांनी याच संदर्भात स्व. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांवर केलेली शेरेबाजी हेही त्याचेच प्रतीक आहे.

स्मार्ट सिटी प्रकल्पाखाली पणजी शहरातल्या सांतिनेज तसेच इतर भागातही विविध कामे हाती घेण्यात आली असून जिथे तिथे रस्ते खोदून ठेवले आहेत. सांतिनेज येथील अनेक व्यावसायिक, दुकानदारांवर आपला व्यवसाय बंद करण्याची वेळ ओढवल्याचे ते सांगत आहेत.

'गोमन्तक'ने जेव्हा सांतिनेज येथील काही व्यावसायिकांशी भेटून त्यांची व्यथा जाणण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना धूळ प्रदूषण, धंद्यात मंदी, श्वसनाचे आजार, गिऱ्हाईक न येणे अशा गोष्टींना रोज सामोरे जावे लागत असल्याचे दिसून आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fatorda Illegal Casinos: फाताेर्ड्यातील कॅसिनोंना सत्ताधाऱ्यांचं 'अभय'! आमदार सरदेसाईंचा घणाघात; कायदा-सुव्यवस्था धोक्यात

IPL 2026 Points Table: आयपीएलचा क्लायमॅक्स सुरु! दिल्लीला पराभवाची धूळ चारत चेन्नई पुन्हा फॉर्ममध्ये, गुणतालिकेत उडवली खळबळ; मुंबई-केकेआरचं पॅकअप?

'ती' 16 बेटे गोव्याचीच! मुख्यमंत्र्यांनी कर्नाटकाचा दावा फेटाळला; महसूल सचिवांना दिले तातडीने चौकशीचे आदेश

Giorgia Meloni Photo: डीपफेकच्या विळख्यात इटलीच्या PM! बनावट फोटो व्हायरल करणाऱ्या युजरला मेलोनींनी झापलं; प्रतिष्ठा धुळीला मिळवण्यासाठी एआयचा वापर

Sarvan Comunidade Land Scam: सर्वण कोमुनिदादची 25 हजार मीटर जमीन परस्पर फस्त, मोठा आर्थिक घोटाळा उघड; गावकऱ्यांना अंधारात ठेवून बिल्डरला जमिनीची विक्री

SCROLL FOR NEXT