Goa News | Ganesh Devi Dainik Gomantak
गोवा

Goa News: 'कालचक्र' हा महाभारताचा केंद्रबिंदू- गणेश देवी

Goa News: महाभारतातील मिथक कोणते अन् इतिहास कोणता हे सांगणे कठीण.

दैनिक गोमन्तक

Goa News: हजारो पुस्तके महाभारतावर लिहिली आहेत. ज्यांनी कधी पुस्तके पाहिली त्या आदिवासींना देखील महाभारत माहित आहे. महाभारतातील मिथक कोणते आणि इतिहास कोणता हे सांगणे कठीण. मात्र, महाभारताचा केंद्रबिंदू वेळ आहे. कालचक्र हा महाभारताचा केंद्रबिंदू आहे, असे प्रतिपादन भाषा अभ्यासक गणेश देवी यांनी केले.

मिथक आणि संस्कृती अभ्यास केंद्र आणि कला संस्कृती संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘महाभारत द एपिक ॲण्ड द नेशन’ या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर ज्ञानपीठप्राप्त दामोदर मावजो, पांडुरंग फळदेसाई, विद्या कामत पार्थन उपस्थित होते.

गणेश देवी म्हणाले, ‘अरबिंदोच्या मते, रामायण हे उत्कृष्ट काव्य आहे तर व्यास हे उकृष्ट कवी मानतात. व्यास नायकांमध्ये गुरफटत नाहीत, ते वेळेला महत्त्व देतात. ग्रीक आणि भारतीय मिथकात साम्य जाणवते. आता ही मिथके ग्रीकमधून भारतात आली, की भारतातून ग्रीकमध्ये गेली हा संशोधनाचा विषय आहे.

महाभारतातील वेळ ही सामाजिक, मिथकीय तसेच विविधांगी आहे.’ या कार्यक्रमात दामोदर मावजो यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन बालाजी शेणवी तर राजू शिंक्रे यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: भेटींचा उत्सव, मतांचा ध्यास! गणेश चतुर्थीत राजकीय नेत्यांच्या भेटीगाठींना उधाण; दर्शनासोबत निवडणुकीच्या समीकरणांचीही चर्चा

America Iran War: 6 महिन्यांत 3.21 लाख कोटींची राखरांगोळी, फायटर जेट्स उद्ध्वस्त, अमेरिकन दूतावासांवर हल्ले; पेंटागनच्या ऑडिट रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

Horoscope 16 September 2026: नशिबाची साथ अन् अचानक जॅकपॉट! आज 'या' राशींच्या आयुष्यात घडणार मोठी उलथापालथ; करिअरमध्ये झेप घेण्याची संधी

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

SCROLL FOR NEXT