Goa Election Dainik Gomantak
गोवा

Goa Election: काँग्रेस, आरजीकडून उमेदवारीचे पत्ते खुले!

Goa Election: काँग्रेसने आपले दोन व आरजी ने आपले तिन्ही उमेदवार जाहीर केले आहेत.

दैनिक गोमन्तक

Goa Election: जिल्हा पंचायतीच्या दवर्ली आणि रेईश मागूस या दोन रिक्त जागांसाठी भाजप आज आपले उमेदवार जाहीर करणार आहे. मात्र, कुठ्ठाळीत अपक्ष आमदार अंतिन्हो वाझ यांच्या उमेदवाराला पाठिंबा राहिल, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी काल दिली. तर काँग्रेसने आपले दोन व आरजी ने आपले तिन्ही उमेदवार जाहीर केले आहेत.

जिल्हा पंचायतीच्या दवर्ली आणि रेईश मागूस या जागा भाजप तर कुठ्ठाळीची जागा अपक्ष उमेदवाराने जिंकली होती. भाजप आताही तीच रणनीती ठेवत दवर्ली व रेईश मागूसची जागा लढवणार आहे.

भाजप सरकारला पाठिंबा दिल्याने कुठ्ठाळीची जागा अपक्ष आमदार अंतोनियो वाझ यांच्या उमेदवाराला सोडण्याची ठरवली आहे. दुसरीकडे आरजीने दवर्ली-अँड्र्यू रिबेलो, कुठ्ठाळी-लेस्ली गामा आणि रेईस मागुस येथून साईनाथ कोरगावकर यांना उभे केले आहे.

काँग्रेसकडून दोन उमेदवार जाहीर

मडगाव जिल्हा पंचायत पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने आपले उमेदवार काल जाहीर केले आहेत. दवर्ली मतदारसंघासाठी लियोन्सीओ रायकर, तर कुठ्ठाळीतून वालेंत बार्बोजा यांच्या नावांची घोषणा प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केली.

रायकर व बार्बोजा यांना नुकतेच काँग्रेस पक्षात सामील करून घेण्यात आले होते. रेईस मागुस मतदारसंघाचा उमेदवार लवकरच जाहीर करण्यात येईल, असे पाटकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT