Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: बलात्कारप्रकरणी गोव्यातील आसिफला 10 वर्षाचा तुरुंगवास!

Goa Crime News: पणजीच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपी आसिफ ख्वाजा ऊर्फ आसिफ खान याला 1 लाख 30 हजारांचा दंड ठोठावला.

दैनिक गोमन्तक

Goa Crime News: खासगी कार्यालयातील सहकारी महिला कर्मचाऱ्याशी मैत्री करुन तिचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी पणजीच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपी आसिफ ख्वाजा ऊर्फ आसिफ खान याला 10 वर्षे कैद व 1 लाख 30 हजारांचा दंड ठोठावला.

आरोपीने पीडितेच्या घरात कोणी नसल्याचा फायदा घेऊन बळजबरी केल्याचे सिद्ध होत असल्याचे निरीक्षण न्यायाधीशांनी निवाड्यात मांडले आहे. बेती-पर्वरी येथे राहत असलेल्या आसिफ खान व पीडिता हे दोघेही पणजीत एकाच खासगी कंपनीत कामाला होते. तिथे त्यांचे प्रेम जुळले. काही महिन्यानंतर तो नोकरी सोडून गोव्याबाहेर गेला.

त्यानंतरही तो पीडितेला फोन करत होता. पुन्हा तो गोव्यात दुसऱ्या कंपनीत नोकरी पत्करून आला. त्याच काळात पीडितेचे कुटुंब तिच्या बहिणीच्या विवाहासाठी मुंबईत गेले होते. त्यावेळी घरी त्याने बळजबरी केल्याची तक्रार पीडितेने जुने गोवे पोलिसांत दाखल केली होती. या प्रकरणी सरकारतर्फे निता मराठे यांनी बाजू मांडली. तर आरोपीच्यावतीने साहिल सरदेसाई यांनी बाजू मांडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Star Cricketer Retirement: ''मी लढाई हरलो...'', स्टार वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम; सततच्या दुखापतींना कंटाळून घेतला मोठा निर्णय

Asian Games Final 2026: अजिंक्य टीम इंडियाची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये भारतीय पोरींनी श्रीलंकेला 147 धावांनी लोळवलं; एशियन गेम्समध्ये भारताचा डंका

Women Cancer Symptoms : महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग कोणता? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच तपासणी करा

Goa Ranji 2026: गोव्याच्या रणजी संघाची तयारी अंतिम टप्प्यात, स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

Goa Rain Shortage: पाऊस न पडल्यास भातशेती धोक्यात; कणसे धरू लागल्याने दिवसातून किमान एक हलकी सर आवश्यक, कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT