goa panchyat elections to be held in June Mauvin Godinho Dainik Gomantak
गोवा

जूनच्या पहिल्या आठवड्यात पंचायत निवडणुका; मॉविन गुदिन्हो‌ यांची माहिती

राज्य निवडणूक आयोग प्रभाग आरक्षणाचे काम करणार; मॉविन गुदिन्हो‌

दैनिक गोमन्तक

राज्यातील पंचायत निवडणुकांची मुदत 20 जूनला संपत असली तरी मे महिन्यात शेवटच्या आठवड्यात या निवडणुका घेण्यात येणार आहेत. जून महिन्यात शाळा सुरू होतात तसेच पावसाळा सुरू असल्याने त्यापूर्वीच निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे ठरविण्यात आले आहे. मात्र, निवडणूक तारीख प्रभाग फेररचना व आरक्षण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ठरविण्यात येईल अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त डब्ल्यू. व्ही. रमणामूर्ती यांनी दिली होती.

दरम्यान, आता पंचायत (Panchayat) निवडणुका जूनच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याचे सांगत फेररचना झाली आहे. आता राज्य निवडणूक आयोग प्रभाग आरक्षणाचे काम करेल. त्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक (elections) होऊ शकतात, अशी माहिती पंचायत मंत्री मॉविन गुदिन्हो‌ यांनी दिली आहे.

सुधारणेसाठी 913 सूचना

190 पैकी 186 पंचायतीची ही निवडणूक होणार असून त्यासाठी पंचायत प्रभागांसाठी तयार करण्यात आलेला फेरररचना मसुदा लोकांना पाहण्यासाठी ठेवण्यात आला होता. त्याची मुदत गेल्या 4 मार्चला संपली. प्रभाग फेररचनेत सुधारणा करण्यासाठी 913 सूचना आल्या आहेत. त्यापैकी 650 उत्तर गोव्यातून (North Goa) तर दक्षिण गोव्यातून 363 हरकती व सूचना आलेल्या आहेत. यामध्ये प्रभाग बदलल्याप्रकरणी व एकच घर क्रमांक काहींच्या बाबतीत झाला आहे. याव्यतिरिक्त जवळ असलेल्या मतदान केंद्राऐवजी दूर ठिकाणी त्याचा समावेश करणे याचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT