Goa Panchayat Election Result
Goa Panchayat Election Result  Dainik Gomantak
गोवा

Goa Panchayat Result: धारबांदोड्यात नव्या चेहऱ्यांना संधी

दैनिक गोमन्तक

धारबांदोडा: धारबांदोडा तालुक्यातील पाच पंचायतीमध्ये झालेल्या 41 प्रभागांमध्ये बहुतेक नवीन चेहरे निवडून आले आहेत, तर काही जुन्या चेहऱ्यांनाही संधी मिळाली आहे. धारबांदोडा पंचायतीमध्ये विनायक यांनी बहुमत प्राप्त केले तर साकोर्डा पंचायतीमध्ये गोविंद सावंत पुरस्कृत दोन्ही उमेदवारांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला असून शिरीष देसाई चौथ्यांदा निवडून आले आहेत. याचबरोबर अनेक प्रस्थापितांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे.

धारबांदोडा पंचायतीमध्ये विनायक गावस हे सलग पाचव्यांदा निवडून आले असून ते आपले प्रतिस्पर्धी विरुद्ध 348 तर स्वाती गावस या सलग चौथ्यांदा निवडून आल्या आहेत. त्या आपल्या प्रतिस्पर्धी विरुद्ध 348 मताने विजयी झाल्या आहेत. पंचायत निवडणुकीतील हा एक दुर्मिळ योगायोग आहे. या पंचायतीमध्ये ‘आरजी’ने कविता गावकर यांच्या रूपाने आपले खाते उघडले आहे‌.

किर्लपाल दाभाड पंचायतीच्या प्रभाग सात मधून रुक्मिणी गावकर ही 72 वर्षांची ज्येष्ठ महिला निवडून आली आहे ,तर माजी सरपंच रमाकांत गावकर, बारकेलो गावकर, माजी पंच सदस्य भानुदास गावकर व कालिदास गावकर हे निवडून आले आहेत.

तालुक्यातील 41 प्रभागांमधून 124 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. तालुक्यातील कुळे- शिगाव पंचायतीच्या प्रभाग पाच मधून प्रसाद गावकर हा एकमेव उमेदवार बिनविरोध निवडून आला होता.

कुळे- शिगाव पंचायतीमध्ये सर्व नवीन चेहरे निवडून आले असून माजी सरपंच व सावर्डे भाजपा मंडळाचे सचिव मच्छिंद्र देसाई यांना पराभवाचा धक्का बसला आहे .माजी सरपंच नरेश शेगावकर हेही पराभूत झाले आहेत. पंचायत निवडणूक यंदा पक्षीय पातळीवर झाली नसली तरी अनेक ठिकाणी भाजप पुरस्कृत उमेदवारांना पराभवाचा धक्का बसला आहे.

पाच पंचायती

धारबांदोडा

सुचिता निळू गावस. 2 विनायक गावस. 3 महेश मधू नाईक. 4 मालू विठू गवळी. 5 गुरु गावकर. 6 रवींद्र दत्ता गावकर. 7 कविता गुरुदास गावकर. 8 दामोदर अर्जुन नाईक. 9 स्वाती वासुदेव गावस.

कुळे-शिगाव

1 नेहा मडकाईकर. 2 सदानंद आनंद बांदेकर. 3 गोविंद शेगावकर. 4 अनिकेत देसाई. 5 ( बिनविरोध), 6 सोनम डोईफोडे. 7 बेनी आजावेदो. 8 साईश प्रकाश नाईक. 9 अश्विनी नंदेश देसाई.

किर्लपाल -दाबाळ

1 सपना कल्पेश गावकर. 2 दामोदर सूर्या बांदेकर. 3 कालिदास लक्ष्मण गावकर. 4 रमाकांत गावकर. 5 बारकेलो गावकर. 6 भानुदास गावकर. 7 रुक्मिणी गावकर. 8 राजेंद्र वेळीप. 9 संध्या गावकर.

मोले

1 जनी दमेकर. 2 प्रणाली विरेकर. 3 सुहास गावकर. 4 कपिल नाईक. 5 वर्षा झोरे. 6 वामन गावकर 7 विठोबा मळेकर.

साकोर्डा

1 संजना नार्वेकर.2 प्रिया प्रदीप खांडेकर. 3. महादेव शेटकर. 4 जितेंद्र कालेकर. 5 शिरीष देसाई. 6 गायत्री देवानंद मापारी. 7 सोनू गावकर.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Todays Update: लाटंबार्से पंचायतीत सत्ताबदल अटळ; आमदार चंद्रकात शेट्ये यांना मोठा धक्का

Margao: दिगंबर कामतांची चिंता वाढली; मडगावमध्ये सरदेसाईंचा 'जनता दरबार', शेकडो लोकांना मांडल्या समस्या

Goa Assembly Session: ST आरक्षणासाठी युरी आलेमाव अधिवेशनात आवाज उठवणार; 'अस्मिताय दिसा'सह 4 खाजगी ठराव

Goa News: कोलवा PSI ने मारहाण केल्याचा आरोप करणाऱ्या महिलेवर खंडणीचा गुन्हा, पतीसह झाली होती अटक

Futsal Goa: गोव्याच्या आंबेली स्पोर्टस क्लबचा गतविजेत्यांना मिनर्व्हा अकादमीला धक्का, उपांत्य फेरीत प्रवेश

SCROLL FOR NEXT