Goa panchayat election Dainik Gomantak
गोवा

Goa Panchayat Election: पंचायतींसाठी प्रभाग पुनर्रचना अधिसूचित

निवडणूक आयोग: आरक्षण प्रक्रिया आठवड्याभरात पूर्ण

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यात होऊ घातलेल्या 186 पंचायतींच्या निवडणुकीसाठीची प्रभाग पुनर्रचना पूर्ण होऊन राज्य सरकारकडून अधिसूचित झाली आहे. येत्या आठवड्याभरात आरक्षण प्रक्रिया पूर्ण करून निवडणूक तारीख जाहीर केली जाईल अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने आज सोमवारी दिली. ही प्रक्रिया लांबली तरच या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता आहे

आयोगाच्या माहितीनुसार, आयोगाने दिलेला प्रभाग पुनर्रचना मसुदा राज्य सरकारने मान्य केला असून आता अधिसूचित झाला आहे. राज्यातील पंचायत सदस्यांच्या आरक्षणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. आरक्षण देताना विशिष्ट प्रकारची काळजी घेण्यात येत आहे. त्यामुळे ही प्रक्रिया किंचित लांबू शकते. ही प्रक्रिया लांबली तर पंचायत निवडणुका नियोजित वेळेपेक्षा आठवडाभरासाठी लांबू शकते. यापूर्वी राज्य सरकारने 4 जून दरम्यान निवडणुका घ्यावेत असे ठरवले होते. आता त्या 10 जून पर्यंत जाण्याची शक्यता आहे. निवडणुका 19 जूनपूर्वी घेणे बंधनकारक आहे.

कच्चा मसुदा सरकारकडे

प्रभाग पुनर्रचनेनंतर राज्य निवडणूक आयोगाने आता आरक्षणाची तयारी सुरू केली आहे. 1528 प्रभागांपैकी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय आणि महिला यांच्यासाठी सुमारे एक हजारपेक्षा जास्त प्रभागांमध्ये आरक्षण लागू होण्याची शक्यता आहे. यासाठीचा कच्चा मसुदा आयोगाने सरकारकडे सादर केला आहे आरक्षणाची अंतिम प्रक्रिया सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT