Goa Panchayat Election Dainik Gomantak
गोवा

Goa Panchayat Election : आमदारांनी पत्ते खुले न केल्‍याने मतदार संभ्रमात; पेडण्‍यात सावध खेळी

दोन्‍ही आमदारांची प्रतिष्‍ठा पणाला; प्रचारही धूमधडाक्‍यात

दैनिक गोमन्तक

मोरजी : पेडणे तालुक्यात पंचायत निवडणुकीसाठीचा प्रचार रंगात आला आहे. तालुक्‍यातील दोन्‍ही आमदारांची प्रतिष्‍ठा पणाला लागलेली आहे. पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर व मांद्रेचे जीत आरोलकर यांनी अजूनपर्यंत पत्ते खुले न केल्‍याने मतदारांमध्‍ये संभ्रम निर्माण झाला आहे.

पंचायत निवडणुका जरी राजकीय पक्षांच्या चिन्हांवर होत नसल्‍या तरी दोन्ही मतदारसंघांतून आपलेच समर्थक उमेदवार निवडून यावेत यासाठी दोन्‍ही आमदारांनी कंबर कसली आहे. काही प्रभागांमध्ये मगोचे मगोविरोधात तर भाजपचे भाजपच्याविरोधात उमेदवार उभे ठाकले आहेत. या आमदारांचे समर्थक उमेदवार कोण, त्यांचे पॅनल कोणते ते अजून जाहीर करण्‍यात आलेले नाही.

लाखो रुपयांची उलाढाल

पंचायत निवडणुकीसाठी उमेदवाराला केवळ 40 हजार रुपये खर्च करण्याची मुभा आहे. परंतु काही प्रभागांमध्ये लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल होत असल्याचे चित्र दिसून येतेय. काही ठिकाणी एका मतासाठी हजारो रुपये देण्याची तयारी उमेदवारांनी केलेली आहे. तर, काही उमेदवारांनी घरात कितीही मते असली तरी एक मोठी रक्कम निश्‍चित केलेली आहे.

ओल्या पार्ट्यांना उधाण : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावागावांत, वाड्यावाड्यांवर ओल्या पार्ट्यांच्या मेजवानी रंगत आहे. मद्यालयांमध्‍ये तर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. श्रावण महिना असल्याने त्यावर काही निर्बंध आले असले तरी काही युवकांची बारमध्ये रेलचेल वाढली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT