Goa Panchayat Election Dainik Gomantak
गोवा

Goa Panchayat Election : चांदेल सरपंचपदी तुळशीदास गावस यांची बिनविरोध निवड?

तिसऱ्यांदा ते मोठ्या मतांच्या मताधिक्याने निवडून आल्यामुळे त्यांची सरपंच पदी बिनविरोध निवड निश्चित होण्याची शक्यता आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Panchayat Election : तिसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले चांदेल हसापूर पंच सदस्य तुळशीदास गावस यांची सरपंचपदी निवड बिनविरोध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. माजी सरपंच तुळशीदास गावस मागच्या तीन निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजयी झालेले आहे. दर निवडणुकीत त्यांचं मताधिक्य वाढत असल्याचे चिन्ह पूर्णपणे दिसत आहे. आणि तिसऱ्यांदा ते मोठ्या मतांच्या मताधिक्याने निवडून आल्यामुळे त्यांची सरपंच पदी बिनविरोध निवड निश्चित होण्याची शक्यता आहे.

स्थानिक आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या सहकार्याबरोबरच नवनिर्वाचित पंच सदस्यांचा त्यांना पाठिंबा आहे. पूर्णपणे पाठिंबा मिळाल्याने लवकरच त्यांची बिनविरोध निवड होणार आहे. चांदेल हसापूर पंचायत क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 4 मधून निवडून आलेले पंच सदस्य तुळशीदास गावस यांची पुढील अडीच वर्षासाठी सरपंच म्हणून निवड करण्यात आली, तर पाच वर्षासाठी उपसरपंच पद हे महिलांसाठी राखीव असल्यामुळे रुचिरा रमेश मळीक यांना उपसरपंच पद देण्यात येईल.

याशिवाय दीड वर्षे प्रजय पांडुरंग मुळीक, तर एक वर्ष बाळा बाबू शेटकर यांना सरपंचपद देण्याचे अलिखित करारानुसार ठरवण्यात आले. आमदार प्रवीण आर्लेकर यांनी नवनिर्वाचित पंच सदस्यांची बैठक आयोजित करुन सुरुवातीसाठी अडीच वर्षे सरपंच म्हणून तुळशीदास गावस, तर पूर्ण पाच वर्षाचा कार्यकाळ उपसरपंच म्हणून रुचिरा रमेश मळीक यांची निवड केली. 

सरपंच आणि उपसरपंच पदासाठी अजून अधिकृत निवडणूक जाहीर झाली नसली तरी चांदेल हसापूर पंचायत मंडळ आणि आमदार प्रवीण आर्लेकर यांनी संयुक्त बैठक घेऊन वरील पदासाठी बिनविरोध दोघांचीही निवड केल्याचे जाहीर केले. पेडणे तालुक्यातील हळर्ण तळर्ण चांदेल हसापूर आणि कासारवर्णे या तिन्ही पंचायतीवर भाजपचे पूर्णपणे बहुमत सिद्ध झालेले आहे. सरकारच्या माध्यमातून तिन्ही पंचायतीचा समान विकास भाजप सरकारच्या सहकार्यातून करण्यात येणार आहे, असं आमदार प्रवीण आर्लेकर यांनी स्पष्ट केलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pooja Naik: 'हा तर सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न...' पूजा नाईकच्या आरोपांवर काय म्हणाले आमदार मायकल लोबो?

Rama Kankonkar Assault Case: रामा काणकोणकर हल्ला प्रकरणी मोठी अपडेट; गोवा पोलिसांकडून 1371 पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

VIDEO: भारत-पाक सामन्यात 'चिटींग'? खेळाडूनं घेतला जबरदस्त झेल, तरीही पंचानी दिलं नॉट आउट! 'ICC'चा नियम काय सांगतो?

Viral Video: हा आहे खरा 'देसी' जुगाड! 'अल्ट्रा प्रो मॅक्स' व्हिडिओ व्हायरल, तुमच्याही तोंडून निघेल 'काय कल्पना'!

Goa Accident: 'रेंट अ कॅब' थार कारची दुचाकीला धडक; भाऊ-बहीण गंभीर जखमी, कारचालक फरार

SCROLL FOR NEXT