Goa Politics Dainik Gomantak
गोवा

Goa Politics : मुलीपाठोपाठ आता आईही राजकारणात

सांताक्रुझ; सरपंचपदी जेनिफर ओलिव्हेरा, उपसपंचपदी इनासिओ परेरा

दैनिक गोमन्तक

पणजी : सांताक्रुझ पंचायतीमध्ये 11 पैकी 10 उमेदवार प्रथमच निवडून आलेले आहेत. त्यामुळे आज झालेल्या सरपंच व उपसरपंचपदासाठी बिनविरोध निवड झाली. सरपंचपदी जेनिफर टोमी हिलिटर दि ओलिव्हेरा यांची, तर उपसरपंचदी इनासिओ परेरा यांची निवड झाली. 4 पंच सदस्यांनी या निवडणुकीत भाग घेतला नाही. त्यामुळे सांताक्रुझमध्ये जिल्हा पंचायत सदस्यपदी शायनी ओलिव्हेरा यांच्या पाठोपाठ त्यांची आई जेनिफर ओलिव्हेरा यांनी राजकारणात प्रवेश केला आहे.

सांताक्रुझ पंचायतीमध्ये सरपंच व उपसरपंचपदासाठी जेनिफर ओलिव्हेरा, तर उपसरपंचपदासाठी इनासिओ परेरा यांनी अर्ज भरले. 4 पंच सदस्यांनी पंचायत कार्यालयात येऊन आपली उपस्थिती दाखवून निघून गेले, त्यामध्ये लुईझा फर्नांडिस, संदीप सावंत, पीटर आरावजो व रोझी फर्नांडिस यांचा समावेश होता. इल्सन ब्रागांझा, लाफिरा ओलिव्हेरा इनासिओ परेरा, मंगेश गांवको, जेनिफर ओलिव्हेरा, पेरपेच्युआ डिसोझा व अमाबेल गोम्स हे 7 पंच सदस्य एका गटात असल्याने ही निवड बिनविरोध झाली. पंच सदस्य लाफिरा ओलिव्हेरा या एकमेव दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत.

सांताक्रुझ पंचायत सरपंचपद हे महिलांसाठी राखीव असल्याने जेनिफर ओलिव्हेरा व रोझी फर्नांडिस या पदासाठी इच्छुक होत्या. जेनिफर यांचे पती टोमी यांनी जिल्हा पंचायतीवर मुलगी शायनी ओलिव्हेरा हिला निवडून आणले होते.

जुन्या पंच मंडळाला कचरा समस्या भोवली

सांताक्रुझ पंचायतीमधील लोकांनी दुसऱ्यांदा निवडणुकीत उतरलेल्या पंच सदस्यांना घरी पाठवून नव्यांना संधी देण्याचा घेतलेला निर्णय सार्थ ठरविला. त्यामुळे या नव्या पंचायत मंडळाकडून लोकांच्या कचरा समस्येवर तोडगा काढण्याबाबत अपेक्षा आहेत. आजपर्यंत पंचायत मंडळ ही समस्या सोडवू शकली नव्हती.

पंचायत सदस्यांनी संगीतखुर्ची खेळत सरपंच व उपसरपंचपद सहा - सहा महिने भूषविले. मात्र, एकानेही कचरा समस्या गंभीरतेने न घेतल्याने या पंचायत क्षेत्रातील कचरा समस्येमुळे उच्च न्यायालयाकडून वारंवार ताशेरे व दंडात्मक कारवाईही झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT