Goa Panchayat Election Dainik Gomantak
गोवा

Goa Panchayat Election : कळंगुटमधील प्रभाग 9 मध्ये 12 वाजेपर्यंत 28 टक्के मतदान

कळंगुट पंचायतीच्या वार्ड 9 मधून 6 उमेदवार रिंगणात असून 950 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

Kavya Powar

काल (10 ऑगस्ट) रोजी 186 पंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. मात्र यादरम्यान कळंगुटमधील वार्ड क्रमांक 9 चे मतदान आजवर ढकलण्यात आले. उमेदवारांची नावं आणि चिन्ह यात विसंगती आढळल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

मतदानासाठी केंद्रावर आलेल्या मतदारांचा मात्र यामुळे चांगलाच खोळंबा झाला. तांत्रिक घोळामुळे मतदारांना मतदान न करताच घरी परतावे लागले.

दुपारी 12 वाजेपर्यंत या प्रभागात 28 टक्के मतदान पार पडले आहे. एकंदरीत चित्र पाहता मतदानाला मतदारांचा अल्प प्रतिसाद मिळाला असल्याचे दिसून आले आहे. काल अचानक झालेल्या गफलतीमुळे मतदारांचा मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला होता.

मतदानासाठी सरकारतर्फे सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली होती. मतदारांना मतदानासाठी आज पुन्हा सुट्टी घेणे भाग असल्याने वॉर्ड 9 मध्ये लोकांनी झालेल्या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली.

कळंगुट पंचायतीच्या वार्ड 9 मधून 6 उमेदवार रिंगणात असून 950 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. दुसरीकडे, पेडणे तालुक्यातील एकूण 17 ग्रामपंचायतींसाठी शांततेत मतदान पार पडले. सकाळपासून मतदानकेंद्रांवर मतदारांच्या रांगा दिसून येत होत्या. पावसाची पर्वा न करता मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. पेडणे तालुक्यातील मोरजी, आगरवाडा, मांद्रे, पार्से, पालये, केरी, कोरगाव, हरमल, वझरी, तोरसे, तांबोसे, विर्नोडा, तुये, वारखंड, हणखणे, धारगळ, न्हयबाग-पोरसकडे या 17 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये उत्साह दिसून आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेट ऑस्ट्रेलियानेच रचला होता कट? दोषी कोण हे आधीच ठरलं होतं, सँडपेपर प्रकरणावर वॉर्नरचा खुलासा; म्हणाला, "स्टार्क, हेझलवूड अन् लायनची चौकशीच झाली नाही!"

Road Accident: नुवे चर्चजवळ 2 दुचाकींची समोरासमोर धडक; उपचारादरम्यान एकाचा मृत्यू, दुसरा जखमी

Government Employees NFSA Benefits: सरकारी नोकरी असूनही स्वस्त धान्याची हाव? तब्बल 1.82 लाख रेल्वे कर्मचाऱ्यांची नावं रेशन कार्ड यादीत; रेल्वे बोर्डाकडून चौकशीचे आदेश

Preschool Assistants Protest: महिन्याला केवळ 10 हजार रुपये वेतन; पूर्व प्राथमिक मदतनीसांचा सरकारविरोधात एल्गार, कारकुनांप्रमाणे सुविधा देण्याची मागणी

Konkani Drama Competition: कोकणी नाट्यस्पर्धांचा रंग का फिका पडतोय? 4 वर्षांत सहभागी संस्थांची संख्या 24 वरून 13 वर; प्रेक्षकांचीही पाठ

SCROLL FOR NEXT