Marine Board | Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: अवजड वाहनांच्या रस्ते वाहतुकीला पर्याय

Goa Tourism: राज्यातील पर्यटन व्यवसाय वाढीसाठीही होणार फायदा

दैनिक गोमन्तक

Goa Tourism: राज्यात अत्याधुनिक रो रो फेरीसेवा सुरू करण्याचा राज्य सरकारकडून विचार आहे. या फेरीसेवेच्या माध्यमातून कमी वेळेत अवजड, मालवाहू वाहने, प्रवासी बसेस यांची वाहतूक करणे शक्य आहे.

पर्यटनवाढीसाठीही ही सेवा फायदेशीर ठरणार असून आंतरिक जलमार्ग विकसित करून आर्थिकदृष्ट्या याचा फायदा होणार आहे, अशी माहिती बंदर कप्तान खात्याच्या सूत्रांनी ‘गोमन्तक’ला दिली.

रस्त्यावरून वाहतूक करण्याऐवजी कमी खर्चात आणि अधिक पर्यावरणपूरक पद्धतीने वाहतूक करण्याचे फायदे रो रो फेरीद्वारे मिळणार आहेत. तसेच वेळ आणि अंतर देखील कमी करता येईल, म्हणून गोव्यासाठी ही सेवा फायदेशीर ठरणार आहे. सध्या आसाम, गुजरात, महाराष्ट्र, केरळ आणि पश्‍चिम बंगाल या राज्यांमध्ये ही सेवा सुरू आहे.

याविषयी माहिती घेण्यासाठी नदी परिवहनमंत्री सुभाष फळदेसाई, आमदार जीत आरोलकर, तसेच बंदर कप्तान, नदी परिवहन खात्यातील अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने कोची, केरळ येथे जाऊन प्रत्यक्ष फेरी सेवेचा अनुभव घेतला.

पहिल्या टप्प्यात दोन ठिकाणी सेवा

पहिल्या टप्प्यात राज्यात दोन रो-रो फेरीसेवा करण्यासंबंधी काम हाती घेतले जाणार आहे. यातील एक फेरी प्रायोगिक तत्त्वावर असेल. यासाठी भारतीय आंतरिक जलमार्ग प्राधिकरणाकडून (आयडब्ल्युएआय) निधी आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

ही फेरी अत्याधुनिक असून जास्त वेगाने धावण्यासाठी यात विशिष्ट यंत्रणा (अझिमथ थ्रस्टर्स) बसविली आहे. फेरीची वजन क्षमता 50 टन असणार आहे, तर खोली (ड्राफ्ट) 1.8 मीटर असणार आहे.

फेरीबोटीला उत्तम पर्याय

मुंबई ते अलीबाग या जलमार्गावर सध्या रो-रो फेरी सेवा सुरू असून याचा पर्यटनाला फायदा झाला आहे. या फेरीसेवेमुळे मुंबई व परिसरातील लोक विकेंडसाठी स्वत:ची वाहने घेऊन अलीबागला जातात.

गोव्यात देखील हीच संकल्पना अस्तित्वात आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सध्या राज्यातील अनेक पर्यटन स्थळांवर जाण्यासाठी फेरीबोटीचा वापर केला जातो. या ठिकाणी रो-रो सेवा सुरू केल्यास त्या भागात पर्यटनवाढीला वाव मिळणार आहे.

"रो-रो फेरीसेवेचा विदेशात मोठ्या प्रमाणात वापर होतो. भारतातही अनेक ठिकाणी सध्या ही सेवा सुरू असून याचे आर्थिकदृष्ट्या अनेक फायदे आहेत. गोवा हे पर्यटनस्थळ असल्याने याचा फायदा पर्यटन उद्योगालाही होईल. राज्यातील आंतरिक जलमार्ग विकसित करण्यावर सरकारचा भर आहे. त्या अनुषंगाने रो-रो फेरीसेवा लाभदायी ठरणार आहे."

- ऑक्टाव्हियो रॉड्रिग्स, सागरी अभियंता आणि जहाज सर्वेक्षक, बंदर कप्तान खाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT