power, electricity Dainik Gomantak
गोवा

Goa News: ताळगावात एका तासात सातवेळा वीज खंडित

Goa News: वीज खात्याचा पुरवठा सध्या तांत्रिक कारणामुळे अधून-मधून खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत.

दैनिक गोमन्तक

Goa News: ताळगाव परिसरात वीज खात्याचा पुरवठा सध्या तांत्रिक कारणामुळे अधून-मधून खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत. यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. वैतियान-ताळगाव शुक्रवारी सायंकाळी साडेपाच ते साडेसहा या एक तासाच्या अंतरात सातवेळा वीज खंडित होण्याचा प्रकार घडला. यामुळे वीज खात्याच्या या कारभाराविरोधात अनेकांनी नाराजी व्यक्त केली.

ताळगाव पठरावर असलेल्या मॉडेल्स को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसोयटीने सप्टेंबर महिन्यातच ताळगावच्या वीज उपविभागीय अधिकाऱ्यांना पत्र लिहिले होते. या सोसायटीत 9 इमारती आहेत. 270 फ्लॅटच्या या इमारतीला 9 लिफ्ट आहेत.

अचानक वीज गेल्याने लिफ्ट मध्येच बंद पडून अडकतात, त्याचा नागरिकांना अनेकदा त्रास सहन करावा लागला आहे. या इमारतीसाठी या सोसायटीने अतिरिक्त ट्रान्स्फॉर्मरची जोडणीही मागितली आहे.

उन्हाळा किंवा पावसाळा असता आणि वीज खंडित होण्याचा प्रकार घडला असता तर लोक असे प्रकार घडत असतात, असे समजून जातात. परंतु ऐन नोव्हेंबरमध्ये वाढलेला उष्मा पाहता लोक चांगलेच हैराण झाले आहेत, त्यात खंडित विजेमुळे भर पडली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT