Goa Bombay High Court | Goa News  Dainik Gomantak
गोवा

Goa News: सचिन बोरकरांच्या जामिनावर आज फैसला

Goa News: धान्यसाठा काळाबाजार प्रकरणी अर्जदाराने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे.

दैनिक गोमन्तक

Goa News: धान्यसाठा काळाबाजारमधील मुख्य सूत्रधार असलेल्या संशयित सचिन बोरकर याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. पोलिसांनी केलेली कारवाई ही राजकीयप्रेरित असून माझी प्रतिमा मलिन करण्याचा हा डाव आहे.

जो काही गुन्हा नोंदविण्यात आला आहे, त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही. न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर करावा व ज्या काही अटी घातल्या जातील त्याचे पालन केले जाईल, असा दावा अर्जदाराने केला आहे.

संशयित सचिन बोरकर याच्याविरुद्ध 2012 साली फोंडा क्षेत्रात धान्यसाठा काळाबाजारप्रकरणी कारवाई झाली होती. मात्र, तो 2018 मध्ये या प्रकरणातून निर्दोष सुटला होता. त्याच्या नातेवाइकाचे बोरी येथे स्वस्त धान्य दुकान आहे.

तसेच फोंडा तालुक्यातील काही स्वस्त धान्य दुकानधारकांशी लागेबांधे आहेत. रेशनकार्डधारक जे कोणी धान्यसाठा नेण्यास येत नाहीत, त्या कार्डधारकांच्या नावावरील बाकी राहणारा धान्यसाठा या दुकानधारकांकडून तो विकत घेतो व त्याचा साठा करून त्यानंतर कर्नाटकात विक्री करतो.

या प्रकरणातील फरारी असलेला वीरेंद्र म्हार्दोळकर यानेही अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. त्याच्या अर्जावरील सुनावणी 21 नोव्हेंबरला ठेवण्यात आली आहे. कुंडई येथे तांदूळ व गहू या धान्यसाठ्याने भरलेला ट्रक जप्त करण्यात आला होता.

क्राईम ब्रँच सादर करणार पुरावे :

क्राईम ब्रँचने संशयित सचिन बोरकर याच्या अर्जाला विरोध करण्याची पूर्ण तयारी केली आहे. त्यासाठी त्यांनी गेल्या दोन दिवसांत जमा केलेली माहिती तसेच पुरावे उद्या या सुनावणीवेळी सादर करण्यात येणार आहेत.

त्याच्या कुर्टी - नागझर येथील गोदामात तसेच तेथे धान्याची पोती भरताना जप्त केलेल्या ट्रकातील पोती कोणाकडून आणली होती या माहितीचा शोध घेण्यासाठी त्याची पोलिस कोठडी आवश्‍यक आहे अशी बाजू मांडण्याची तयारी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'मतदारांना विचारूनच भाजपमध्ये आलो'; निलेश काब्राल यांच्या टीकेला रोहन खंवटे यांचे प्रत्युत्तर, म्हणाले...

IND vs AUS: गोव्याच्या 18 वर्षीय व्यंकटचे युवा वनडे पदार्पण दिमाखात; ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताच्या विजयात घेतली कर्णधाराची महत्त्वाची विकेट

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'चा जबर दणका! पाक एअरफोर्सचा एअरबेस अजूनही कोमात; सॅटेलाइट कॅमेऱ्यानं पकडली पाकड्यांची चोरी

CCTV Mandatory in medical: औषध दुकानांवर आता सीसीटीव्हीची नजर! H, H-1 आणि X औषधांच्या विक्रीवर नियंत्रणासाठी केंद्राचा मोठा प्रस्ताव

Porvorim Elevated Road: पर्वरी उन्नत मार्गावर अपघात, पाणी साचण्याच्या समस्येवर 'आप'चा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT