Water Taxi |Goa News  Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism News: पर्यटकांसाठी वॉटर टॅक्सी सुरू करणार

Pramod Sawant: लवकरच ॲप बेस आणि डिजिटल टॅक्सीही

दैनिक गोमन्तक

Goa Tourism News: राज्यात ॲप बेस आणि डिजिटल टॅक्सीचा विषय चर्चेत असतानाच पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी वॉटर टॅक्सीही सुरू करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. दिल्लीत सुरू असलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

उदघाटनासाठी सज्ज असलेले मोपा विमानतळ हे शेजारील महाराष्ट्र आणि कर्नाटकसह पश्चिम किनारपट्टीवरील राज्यांसाठी महत्त्वाची भूमिका बजावेल, असेही ते यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्री म्हणाले की, देशात 2014 पूर्वी पर्यटन क्षेत्रातल्या साधनसुविधा हव्या तितक्या प्रमाणात उभारल्या गेल्या नाहीत. त्यामुळे इतर देशांच्या तुलनेत आपला देश या क्षेत्रात मागे राहिला. मात्र, यापुढील काळात तरी राज्याने स्वतःचे मार्केटिंग करण्यापेक्षा ‘एक भारत’ म्हणून मार्केटिंग करणे गरजेचे आहे.

तसे झाल्यास देशाच्या पर्यटनाला त्याचा मोठा फायदा होईल. राज्यात 2012 ते 2022 पर्यंत मोठ्या प्रमाणात साधनसुविधा निर्माण झाल्या आहेत. यात मांडवी नदीवरील अटल सेतू, झुवारी नदीवरील पूल, मोपा विमानतळ, राष्ट्रीय महामार्गाचे निर्माण अशा साधनसुविधांचा समावेश आहे.

देशात सर्व प्रकारची पर्यटन स्थळे आहेत. मात्र, या पर्यटन स्थळांकडे 2014 पूर्वी लक्ष दिले गेले नाही. आता आम्ही राज्यात साधन सुविधांबरोबरच मनुष्यबळ विकासासाठीही प्रयत्न करत आहोत, असे मुख्यमंत्री सावंत यांनी स्पष्ट केले.

पश्चिम विभागासाठी ‘मोपा’ बजावेल महत्त्वपूर्ण भूमिका

मुख्यमंत्र्यांच्या नजरेतून पर्यटन

  • ‘अतिथी देवो भव’ या ब्रीदवाक्याप्रमाणे राज्यात शाश्वत पर्यटन वाढावे, यासाठी डिजिटल पर्यटनाकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे.

  • होम स्टे, मेड इन ब्रेकफास्ट यासारख्या सुविधा सांगे, केपेसारख्या भागात सुरू होत आहेत.

  • न्यायालयाच्या आदेशानुसार रेल्वे दुपदरीकरण, रस्ते, वीज वाहिन्यांच्या तमनार प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे.

  • केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या मिशनमुळे राज्याला मोठा फायदा होत आहे.

  • येत्या दोन वर्षांत पर्यटन व माहिती आणि तंत्रज्ञान खात्याच्या सहकार्याने ‘वर्क फ्रॉम गोवा’ ही संकल्पना सत्यात उतरणार आहोत.

विमान प्रवासी घेणार वॉटर टॅक्सीचा आनंद

महामार्गांवरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी राज्यात पर्यटकांसाठी वॉटर टॅक्सी सुरू करण्याचा विचार आहे. मोपा वा दाबोळी विमानतळावर उतरल्यानंतर हे पर्यटक आणि प्रवासी या वॉटर टॅक्सीच्या साहाय्याने इच्छित स्थळी पोहोचतील. यासाठी केंद्र सरकारकडून राज्यात उभारल्या जाणाऱ्या जेटीची मदत होणार आहे. राज्यातील पर्यटकांच्या प्रामुख्याने महिलांच्या सुरक्षिततेसाठी पिंक पोलिस फोर्स उभारली आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

...म्हणून ‘मोपा’ दोन वर्षे रखडला

राज्यात मोपा विमानतळ अनेक अर्थांनी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. काही बिगर सरकारी संस्थांनी केलेल्या विरोधामुळे हा प्रकल्प दोन वर्षे रखडला. त्यामुळे देशाचे आणि राज्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. आता हा प्रकल्प तयार होत आहे. त्याचा राज्याला आणि शेजारील महाराष्ट्र, कर्नाटकसह पश्चिम किनारपट्टीवरील राज्यांना फायदा होईल.

पर्यटक अनुभवणार ‘फिल गुड’ :

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी राज्यात किनारी पोलिस स्थानके उभारली आहेत. पर्यटकांना ‘फिल गुड’ अनुभवता यावे, यासाठी हे पोलिस कार्यरत आहेत. केंद्र सरकारच्या नीलक्रांती (ब्लु रिव्होल्युशन), स्वदेश दर्शन, प्रसाद या योजनांचा राज्याला फायदा झाला असून या योजनांच्या सहकार्याने अनेक साधनसुविधा उभारल्या जात आहेत, असेही सावंत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT