Goa News | Mineral Auction Dainik Gomantak
गोवा

Goa News: आणखी 4 खनिज ब्लॉक्सची ई-लिलावासाठी तयारी सुरू

Goa News: पहिल्‍या टप्‍प्‍यातील प्रक्रियेसाठी दिली मुदतवाढ

दैनिक गोमन्तक

Goa News: सरकारच्या खनिज आणि भूगर्भशास्त्र खात्याच्या वतीने जाहीर केलेल्या पहिल्या चार ब्लॉक्सच्या ई-लिलावाची प्रक्रिया सुरू असून आणखी चार ई-ब्लॉक्ससाठीची तयारी खनिज खात्याच्या वतीने सुरू असल्याची माहिती खात्याचे संचालक डॉ. सुरेश शानभोग यांनी दिली. तर दुसरीकडे ई-लिलावासाठी नीती आयोगाची मदत घेणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे.

खनिज खात्याच्या वतीने एमएसटीसी ई-कॉमर्स आणि सीबीआय कॅप यांच्या सहकार्याने डिचोली, शिरगाव-मये, मोंत द शिरगाव आणि काले या चार खनिज ब्लॉक्सचा ई-लिलाव जाहीर केला आहे. यासाठीच्या लिलाव प्रक्रियेमधला सहभाग वाढवण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

यापूर्वी लिलाव दस्तऐवज खरेदी करण्याची तारीख 15 नोव्हेंबर होती, ती आता २२ नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे, तर सर्व कागदपत्रांसह बीड सादर करण्याची तारीख 21 नोव्हेंबर होती, ती आता 28 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.

मात्र, लिलावाच्या अंतिम तारखेमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केलेला नाही. 15 ते 21 डिसेंबरपर्यंत या चार ब्लॉक्सचा लिलाव पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती खात्याचे संचालक डॉ. शानभोग यांनी दिली. याशिवाय आणखी चार ब्लॉक्सची माहिती गोळा करण्याचे काम खात्याच्या वतीने पूर्ण करण्यात आले आहे.

नीती आयोगाची मदत घेणार

खनिज डंप आणि सबग्रेड खनिज असलेल्या डंपमुळे जमीन पडीक ठेवावी लागत असल्याचा दावा करून या डंपच्या ई-लिलावासाठी नीती आयोगाने मदत करावी, अशी मागणी आयोगाच्या सदस्यांकडे केली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. यासाठी सर्वोच्च न्यायालयाची मदत घेणार असल्याचेही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यावेळी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT