Goa Fisherman | Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa News: ट्रॉलर्सवरील 571 मच्छीमारांना लाभ

Goa News: मच्छीमारी सुरक्षा योजना : आतापर्यंत 55.79 लाख रुपये निधीचा वापर funds

दैनिक गोमन्तक

Goa News: राज्यातील खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या ट्रॉलर्ससाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त समुद्रात मच्छीमारांच्या सुरक्षा योजनेअंतर्गत आतापर्यंत 571 मच्छीमारांना लाभ मिळाला आहे. योजनेसाठी एक कोटी रुपये निधी केंद्र आणि राज्य सरकारने मिळून निश्‍चित केला होता. त्यापैकी 55.79 लाख रुपये निधी वापरण्यात आला आहे, अशी माहिती मच्छीमार खात्याने ‘दै.गोमन्तक’ला दिली आहे.

योजनेअंतर्गत लाईफ जॅकेट, बोट, फिश फाईंडर, एआयएस आणि जीपीएससारख्या उपकरणांसाठी निधी दिला जातो. या उपकरणांशिवाय ट्रॉलर्सना मासेमारी करायला जाण्याची परवानगी दिली जात नाही.

मासेमारीला जाण्यापूर्वी प्रत्येक ट्रॉलरला पास काढण्याचा नियम असून तेव्हा धक्क्यावर असलेल्या मच्छीमार खात्याच्या अधिकाऱ्याकडून ट्रॉलरचे निरीक्षण करण्यात येते. त्यामुळे मोठ्या संख्येत ट्रॉलर मालक या योजनेचा लाभ घेत आहेत. फिश फाईंडर, एआयएस आणि जीपीएस यांचा लाभ मिळालेल्यांची संख्या 97 आहे.

लाईफ जॅकेट्‌ससाठी तरतूद

आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 237 जणांनी लाईफ जॅकेट्‌ससाठी अर्ज केला होता. तर 2022-23 (सप्टेंबरपर्यंत) 237 जणांचे अर्ज मिळाले आहेत. त्यामुळे गेल्या दीड-दोन वर्षात हा आकडा 474 झाला आहे. लाईफ जॅकेट्‌ससाठी 28.14 लाख रुपयांची तरतूद केली आहे, असे मच्छीमार खात्याच्या अधीक्षक प्रीतम नाईक यांनी सांगितले.

समुद्रात मच्छीमारांच्या सुरक्षा योजनेला मच्छीमारांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. योजनेअंर्तगत केंद्राकडून 50 टक्के आणि राज्य सरकारकडून 25 टक्के निधी देण्यात येतो. उर्वरित 25 टक्के निधी लाभार्थींकडून दिला जातो. मच्छीमार धक्क्यांवरील अधिकारी, कर्मचारी शिबिरांचे आयोजन करून जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करतात.

- प्रीतम नाईक, मच्छीमार खात्याच्या अधीक्षक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT