Goa News  Dainik Gomantak
गोवा

Panaji News: चिरेखाणीप्रकरणी 23 तक्रारींची चौकशी

Panaji News: गोवा खंडपीठाला माहिती : कुळे येथील दोघा पोलिस निरीक्षकांवर आरोपपत्र

दैनिक गोमन्तक

Panaji News: खाण व भूगर्भ खात्याने सर्वेक्षणाअंती दाखल केलेल्या 23 तक्रारीप्रकरणी पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. मोले येथील बेकायदा चिरेखाण प्रकरणात निष्काळजीपणा केल्याबद्दल प्रज्योत फडते आणि संजय दळवी या दोघा अधिकाऱ्यांवर पोलिस खात्यांतर्गत आरोपपत्र ठेवून त्यांची चौकशी केली जाणार आहे, अशी माहिती आज सरकारतर्फे मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला देण्यात आली.

मोले येथील चिरेखाणप्रकरणी बुधो गावकर यांनी उच्च न्यायालयात याचिका सादर केली होती. त्यावेळी राज्यातील बेकायदा चिरेखाणींचा सर्वे करून त्याविरुद्ध कोणती कारवाई केली, त्याचा अहवाल सादर करण्यास सांगितले होते.

आज न्यायालयाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात खाण खात्याने बेकायदा चिरेखाणींच्या 25 तक्रारी नोंद केल्या होत्या व त्या पोलिस खात्याकडे पाठविल्या होत्या. त्यातील 23 तक्रारींचा तपास सुरू आहे, तर 2 तक्रारीप्रकरणी खाण खात्याने कारवाई केली आहे.

निष्काळजीपणा भोवला

दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक अभिषेक धानिया यांनी खंडपीठाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात निरीक्षक प्रज्योत फडते आणि संजय दळवी यांच्याविरुद्ध लवकरच चौकशी सुरू केली जाईल, असे नमूद केले आहे. मोले येथील चिरेखाणप्रकरणी तक्रार देऊनही तत्कालीन पोलिस अधिकाऱ्यांनी तिची दखल घेतली नव्हती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT