Lav Diaz | Goa News Dainik Gomantak
गोवा

IFFI Goa 2022: डियाझना विशेष ज्युरी पुरस्कार प्रदान

व्हेन द वेव्हज आर गॉन : असिमिना प्रोड्रू सर्वोत्तम उदयोन्‍मुख दिग्दर्शक

दैनिक गोमन्तक

53rd IFFI 2022: फिलिपिनो चित्रपट निर्माते लव्ह डियाझ यांना ‘व्हेन द वेव्हज आर गॉन’साठी विशेष ज्युरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर बिहाइंड द हेस्टॅक्स’ साठी असिमिना प्रोड्रू यांना सर्वोत्तम पदार्पण करणाऱ्या दिग्दर्शकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी असलेल्या परीक्षक मंडळाचे नेतृत्व इस्रायली लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक नादाव लॅपिड यांनी केले. परीक्षकांमध्ये अमेरिकन निर्माते जिंको गोटोह, फ्रेंच चित्रपट संकलक पास्कल शेवान्स, फ्रेंच माहितीपट निर्माते, चित्रपट समीक्षक आणि पत्रकार झेवियर अँग्युलो बार्टुरेन, भारतीय चित्रपट दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांचा समावेश होता .

चिरंजीवी ‘इंडियन पर्सनॅलिटी ऑफ द इअर’

प्रसिद्ध अभिनेते चिरंजीवी यांना ‘इंडियन पर्सनॅलिटी ऑफ द इअर’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. काही सन्मान माझ्यासाठी विशेष मौल्यवान आहेत. मला हा पुरस्कार दिल्याबद्दल इफ्फी आणि भारत सरकारचे आभार मानतो.

चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी माझं नाव, कोनिडेला शिव शंकर वरा प्रसाद असं होतं. चित्रपटसृष्टीत ‘चिरंजीवी’ म्हणून माझा पुनर्जन्म झाला. कोनिडेला शिव शंकर वरा प्रसाद म्हणून मला जन्म देणाऱ्‍या माझ्या आई-वडिलांचा आणि चिरंजीवी म्हणून मला जन्म देणाऱ्‍या चित्रपटसृष्टीचा मी आयुष्यभर ऋणी असेन, असे चिरंजीवी म्‍हणाले.

‘दोनों बाद में बात करेंगे’

यावेळी चिरंजीवी यांना पुरस्कार प्रदान केल्यानंतर, सिनेमातून 10 वर्षांचा ब्रेक घेत राजकारणात प्रवेश केला आणि त्यानंतर पुन्हा एकदा राजकारणातून सिनेमाकडे वळलात. आता पुन्हा सिनेमातून राजकारणाकडॆ वळण्याची काही शक्यता आहे का, असे अनुराग ठाकूर यांनी संधी साधत चिरंजीवी यांना प्रश्न विचारला.

प्रजा राज्यम पार्टी हा आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करणाऱ्या आणि काँग्रेसकडून केंद्रीय मंत्रिपद उपभोगणाऱ्या चिरंजीवी यांनी ‘यावर आपण दोघेच नंतर बोलूया’ असे मिश्कीलपणे सांगितल्‍यावर एकच हशा पिकला.

पुरस्कार वितरण करताना झाला अनावश्यक गोंधळ

यावर्षी परीक्षक आणि सूत्रसंचालक यांच्यात समन्वय नसल्यामुळे मंचावर एकूणच गोंधळाचे वातावरण तयार झाले होते. परीक्षक ज्या सिनेमाची किंवा पुरस्काराची घोषणा करत होते, त्यापेक्षा वेगळ्याच सिनेमांची दृकश्राव्‍यफित चालवली जात होती. त्यामुळे मंचावर नेमके कोणत्या विजेत्याने जायचे याबद्दल गोंधळ होता.

त्यात भरीस भर म्हणजे सूत्रसंचालिका एका पुरस्काराचे नाव घेण्यासाठी परीक्षकांना अप्रत्यक्षरीत्या बजावत होती तर परीक्षक मात्र त्यांच्याकडे असलेल्या नियमानुसार आणि क्रमानुसार पुरस्कार जाहीर करत होते. त्यातही सूत्रसंचालिकेच्या अशा वागण्याबद्दल परीक्षकांनी थेट मंचावरच नाराजी व्यक्त केली. या सगळ्यामुळे महोत्सवाच्या एकूण सूत्रबद्धतेवरच प्रश्नचिन्ह तयार झाले होते.

"प्रादेशिक चित्रपट आता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचले आहेत. या चित्रपट महोत्सवात विविध भाषांमधील उत्तमोत्तम चित्रपट दाखवण्यात आले. त्यामुळे या विविधांगी कलेच्या क्षेत्रातल्या प्रतिभाशाली व्यक्तींच्या कलेचा आविष्कार आपल्याला अनुभवता आला. भारत आज तंत्रज्ञानाचे केंद्र बनले आहे, या उच्च तंत्रज्ञानाच्या आधारावर भारतीय चित्रपटांना जगभरात पोचवण्यासाठी पुढेही प्रयत्न केले जातील."

- अनुराग ठाकूर, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT