Goa Bench of Bombay High Court | Goa News  Dainik Gomantak
गोवा

Goa High Court: मडकई जत्रोत्सव पोलिस बंदोबस्तात

Goa High Court: कायदा व सुव्यवस्थेवर नियंत्रण ठेवा

दैनिक गोमन्तक

Goa High Court: मडकई येथे सुरू असलेल्या नवदुर्गा जत्रोत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्याचा आदेश गोवा पोलिस व जिल्हाधिकाऱ्यांना आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिला.

या जत्रोत्सवाच्या काळात भाविकांकडून देवाला अर्पण करण्यात येणाऱ्या देणग्या, साड्या व वस्तू याचा हिशोब ठेवण्यासाठी सरकारी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे हा जत्रोत्सव पोलिस बंदोबस्तात सुरू आहे.

नवदुर्गा संस्थानच्यावतीने ॲटर्नी साईश कामत यांनी उच्च न्यायालयात याचिका सादर केली होती. जत्रोत्सवाच्या काळात मडकई येथील स्थानिक ग्रामस्थांकडून महाजनांना देवस्थानच्या कार्यात हस्तक्षेप व अडथळे आणून कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याची शक्यता असल्याची भीती व्यक्त केली होती.

या ठिकाणी आवश्‍यक प्रमाणात पोलिस फौजफाटा ठेवण्यात यावा तसेच देवाला अर्पण करण्यात येणाऱ्या वस्तूंचा हिशोब ठेवण्यासाठी सरकारी अधिकाऱ्याची नेमणूक केली जावी अशी विनंती करण्यात आली होती.

ही जत्रा येत्या 18 नोव्हेंबरपर्यंत आहे, तोपर्यंत ही कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी आवश्‍यक ती काळजी घेण्यात येणार आहे. त्यानंतर 30 नोव्हेंबरपर्यंत देवस्थानला भेट देणाऱ्या भाविकांची उपस्थिती असते.

त्यावेळी पोलिस सुरक्षा कायम ठेवणे शक्य नाही. एखादी घटना घडल्यास फोंडा पोलिस स्थानकाच्या अधिकाऱ्यांकडून ती हाताळण्यात येईल, असे राज्याचे ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी सरकारची बाजू मांडताना खंडपीठाला सांगितले.

दररोज 20 पोलिस तैनात

यावेळी राज्याचे ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी सरकारची बाजू मांडताना खंडपीठाला सांगितले की, दरदिवशी या देवस्थानच्या ठिकाणी 15-20 पोलिस तैनात करण्यात येतात. तसेच या ठिकाणी मामलेदारही उपस्थित असतो. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी आवश्‍यक ती काळजी पोलिसांकडून तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडून घेण्यात आली आहे.

महाजन व ग्रामस्थांना सूचना

पोलिसांनी महाजन व स्थानिक ग्रामस्थ यांच्यात कोणताही वाद होऊ नये यासाठी पूर्वीच त्यांच्याशी संवाद साधून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न उपस्थित न करण्याच्या सूचना केलेल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT