Fraud Case Dainik Gomantak
गोवा

Goa Fraud News: धान्यसाठा कोणाचा? आज होणार उलगडा

Goa Fraud News: फरार संशयितांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी

दैनिक गोमन्तक

Goa Fraud News: धान्य चोरीप्रकरणी क्राईम ब्रँचने जप्त केलेला तांदूळ व गव्हाचा साठा नागरी पुरवठा खात्याचा नसल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी त्यांना क्लिन चीट दिली आहे, तर क्राईम ब्रँचने न्यायालयात फरार संशयितांच्या अटकपूर्व जामिनाला विरोध करताना हा साठा सरकारी गोदामातूनच गायब झाल्याचा दावा केला आहे.

या प्रकरणातील मुख्य सूत्रधार सचिन बोरकर आणि संशयित वीरेंद्र म्हार्दोळकर यांच्या अर्जावर 21 रोजी न्यायालयातील सुनावणीवेळी हा साठा कोठून आला, याचा उलगडा होणार आहे.

क्राईम ब्रँचने याप्रकरणी अटक केलेल्या पाचही संशयितांना सशर्त जामीन मिळाला आहे. पान संशयितांनी दिलेल्या जबानीत पोलिसांनी जप्त केलेला धान्यसाठा कुठ्ठाळी तसेच इतर सरकारी गोदामांतून भरल्याचे नमूद केले आहे.

ती माहिती न्यायालयाला क्राईम ब्रँचने दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी हा धान्यसाठा नागरी पुरवठा खात्यातून नव्हे, तर स्वस्त धान्य दुकानातून कर्नाटकात पाठवला जात असल्याचे स्पष्टीकरण दिले होते. मात्र, पोलिसांनी अजूनही यासंदर्भात कोणतेच स्पष्टीकरण दिलेले नाही. या उलगडा संशयित सचिन बोरकर याला रिमांड मिळाल्यानंतरच उघड होणार आहे.

धान्यसाठा वाहतुकीसाठी वापरलेली काही वाहने संशयित बोरकर याची आहेत. स्वस्त धान्य दुकानात रेशन कार्डधारकांना बायोमेट्रिक प्रणालीशिवाय धान्यसाठा दिला जात नाही. तसेच त्यांच्याकडील लेखी नोंद व बायोमेट्रिक मशीनवरील नोंदी सारख्याच असणे आवश्‍यक आहे.

दुकानदारांकडून काळ्याबाजाराला वाव

स्वस्त धान्य दुकानातून हा माल गायब झाला असण्याची शक्यता आहे. कारण, ग्रामीण भागात ज्या ठिकाणी बायोमेट्रिक यंत्राच्या कनेक्टिव्हीटीत अडचणी येतात, तेथे काळाबाजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नागरी पुरवठा खात्याकडून सांगे, पणजी, कुठ्ठाळी व फोंडा येथील सरकारी गोदामांची माहिती मागवली आहे. मात्र, ती सादर केलेली नाही, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji Market: पणजी बाजारात पावसाळी साहित्य खरेदीसाठी गर्दी; छत्र्या, रेनकोटच्या दरात वाढ; दुचाकीस्वारांसाठी खास डिझाइन केलेले रेनकोट

Porvorim Flyover: पर्वरी उड्डाणपूल सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे सरकारचे लक्ष्य, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्‍घाटनाची शक्यता

Hill Cutting: सावधान! डोंगर कापाल तर होणार एक कोटी रुपये दंड! नगर मंडळाचा मोठा निर्णय

बंदर कप्तानच्या टर्मिनलचे सोमवारी उद्‍घाटन, केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा

VIDEO: कचरा टाकल्याचा व्हिडिओ व्हायरल अन् कमेंट बॉक्समध्ये ट्रोलिंगचा खेळ, बदनामीच्या भीतीने म्हापशातील तरूणाची आत्महत्या

SCROLL FOR NEXT