Rohan Khaunte |Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa Culture: 'समृद्ध संस्कृतीचा वारसा जपणे हे आमचे कर्तव्य' - रोहन खंवटे

Goa Culture: 'बांबोळीत ज्येष्ठ नागरिक मनोरंजन केंद्राचा शुभारंभ

दैनिक गोमन्तक

Rohan Khaunte: आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात आज नात्यांतील संवाद, आमची संस्कृती आपण कुठेतरी हरवत चाललो आहोत. समृद्ध संस्कृतीचा वारसा जपणे हे आमचे कर्तव्य असून त्यासाठीच आज एकत्रित समाजाची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन पर्यटन तथा माहिती तंत्रज्ञान मंत्री रोहन खंवटे यांनी केले.

मातृछाया संचालित काबेसा-बांबोळी येथील रुग्णाश्रय संस्थेच्या 15व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ज्येष्ठ नागिरिकांसाठीच्या मनोरंजन केंद्राचा शुभारंभ करताना ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर निमंत्रित पाहुणे व ज्येष्ठ नागरिक उमेश बुडकुले, स्थानिक आमदार रुडॉल्फ फर्नांडिस, मातृछायेचे अध्यक्ष अनुप केणी, शिरीष आमशेकर, रुग्णाश्रयच्या प्रमुख डॉ. शशिकला सहकारी आदी उपस्थित होते.

बालपण हा आमच्या जीवनातील सर्वांत आनंदाचा भाग आहे. पालक आपल्यावर सदोदित चांगले संस्कार करतात व त्यातून आपण घडत असतो. बालपणी अनेक गोष्टींचे आपल्याला गांभीर्यही नसते. म्हणून अनुभवी पालकांचे म्हणणे ऐकून जीवनाची वाटचाल केल्यास ती सोपी बनेल, असे खंवटे यांनी नव्या पिढीला उद्देशून बोलताना सांगितले.

रुग्णाश्रयचे होम नर्सिंग केंद्र महत्त्वाचे

रुग्णाश्रयचे होम नर्सिंग केंद्र महत्त्वाचे आहे. धावपळीच्या युगात ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेण्यासही वेळ नाही, अशी समाजाची स्थिती आहे. ही नाळ ओळखून होम नर्सिंगच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेण्याबाबत समाजात निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याचे कामही रुग्णाश्रयाने केल्यामुळे विश्वस्त संस्थेचे खंवटे यांनी कौतुक केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

SCROLL FOR NEXT