Babush Monserrate Dainik Gomantak
गोवा

Babush Monserrate: जमावाला भडकावण्यास बाबूश मोन्सेरात जबाबदार

Babush Monserrate: पोलिस स्थानक हल्ला : लोटलीकरांची जबानी

दैनिक गोमन्तक

Babush Monserrate: 2008 साली रायन गुदिन्हो याला मारहाण केल्याप्रकरणी संशयितांना गजाआड करण्यात पोलिसांकडून विलंब होत असल्याने पणजी पोलिस स्थानकावर मोर्चा घेऊन आलेल्या तत्कालीन आमदार व विद्यमान मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी सोबत आलेल्या कार्यकर्त्यांच्या जमावासमोर भाषण करून त्यांना भडकावून कायदा हातात भाग घेण्यास पाडले, अशी जबानी आज या पोलिस निरीक्षक तुषार लोटलीकर यांनी न्यायालयात दिली.

जबानी नोंदवण्‍याचे काम पूर्ण न झाल्याने 29 नोव्हेंबरला ती ठेवण्यात आली आहे. मंत्री मोन्सेरात यांनी 19 फेब्रुवारी 2008 साली सांपॉल - ताळगाव येथून कार्यकर्त्यांसोबत चालत पणजी पोलिस स्थानकापर्यंत संध्याकाळच्यावेळी मोर्चा काढला होता. ताळगाव येथील रायन याला झालेल्या मारहाणीतील तिघा संशयितांना अटक करण्याची मागणी करण्यात आली होती.

रात्री साडेनऊ वाजले, तरी कोणतीच कारवाई होत नसल्याने मंत्री मोन्सेरात यांनी पोलिस स्थानक प्रमुखाला निलंबित करण्याची मागणी करत होते. तरीही ती पूर्ण न झाल्याने त्यांनी कार्यकर्त्यांसमोर भडकवणारे भाषण केले होते. या मोर्चामध्ये माजी दोन महापौर टोनी रॉड्रिग्ज व उदय मडकईकर, जेनिफर मोन्सेरात, दया कारापूरकर यांचा समावेश होता.

सीबीआयकडे याप्रकरणी दिलेल्या तक्रारीवर असलेली सही माझीच आहे, असे सत्र न्यायालयात लोटलीकर यांनी जबानीत सांगितले. सीबीआयने हे आरोपपत्र बाबूश मोन्सेरात याच्यासह 36 जणांविरुद्ध सादर केले आहे.

पूर्वनियोजित कट

पोलिस स्थानकावरील हल्ल्यासाठी जमावाने आणलेल्या बाटल्या व दगड ताळगाव येथून आणले होते व त्यातील काही पुरावे म्हणून या प्रकरणांतील संशयितांच्या निवासस्थानाच्या परिसरातून जमा केले होते. त्यामुळे हा पूर्वनियोजित कट असल्याचे सीबीआयच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

दोघेही साध्या वेशात

हल्ल्यावेळी तेथे बाबूश मोन्सेरात व त्यांची पत्नी जेनिफर मोन्सेरात व इतर होते हे साध्या वेशात असलेल्या पोलिसांनी त्यांची ओळख पटविली आहे. हा खटला रद्द करण्यासाठी संशयितांनी उच्च न्यायालयात याचिका सादर केली होती. मात्र उच्च न्यायालयाने त्यांची विनंती फेटाळून लावत सत्र न्यायालयाला त्वरित सुनावणी सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Star Cricketer Retirement: ''मी लढाई हरलो...'', स्टार वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम; सततच्या दुखापतींना कंटाळून घेतला मोठा निर्णय

Asian Games Final 2026: अजिंक्य टीम इंडियाची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये भारतीय पोरींनी श्रीलंकेला 147 धावांनी लोळवलं; एशियन गेम्समध्ये भारताचा डंका

Women Cancer Symptoms : महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग कोणता? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच तपासणी करा

Goa Ranji 2026: गोव्याच्या रणजी संघाची तयारी अंतिम टप्प्यात, स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

Goa Rain Shortage: पाऊस न पडल्यास भातशेती धोक्यात; कणसे धरू लागल्याने दिवसातून किमान एक हलकी सर आवश्यक, कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT