A R Rahman | Goa News | Film IFFI 2022  Dainik Gomantak
गोवा

A R Rahman On Film IFFI 2022: 'भविष्यात सिनेमे पाहताना प्रेक्षकच त्यातील एक कलाकार आहे'- ए. आर. रेहमान

A R Rahman IFFI 2022: सिनेमाचे एकूण विश्वच आभासी तंत्रज्ञानामुळे बदलणार

दैनिक गोमन्तक

IFFI Goa 2022: गेल्या शंभर वर्षांत सिनेमाने अनेक बदल करून मार्गक्रमण केले आहे. प्रत्येक नवी पिढी आपापले नवे तंत्रज्ञान घेऊन सिनेमात वेगवेगळे प्रयोग करत असते. गेल्या काहीवर्षापासून अवस्थेत तंत्रज्ञानाला मिळत असलेला जगभरातला पाठिंबा आणि त्याच वेळेला नागरिकांना या तंत्रज्ञानाचा असलेला ओढा लक्षात घेता

भविष्यात अशा पद्धतीची सिनेमे निर्माण होतील, की ज्यामध्ये सिनेमे पाहताना प्रेक्षकच त्यातील एक कलाकार आहे, असे भासत राहून तो त्या कथेचा एक भाग होऊन जाईल, असे संगीतकार ए. आर. रेहमान यांनी सांगितले. इफ्फीमध्ये आयोजित विशेष परिसंवादात ते बोलत होते.

त्यांच्यासोबत दिग्दर्शक शेखर कपूर, ड्रीम्सस्केप या बहुराष्ट्रीय कंपनीचे रोनाल्ड मेनेजेल, नियॉनचे प्रणव मिस्त्री यांनी या परिसंवादामध्ये सहभाग नोंदवला. नव्या तंत्रज्ञानांसोबत जुळवून घेताना मानवी भावभावना आणि नैतिकता यांचा पाया बळकट असणे नितांत गरजेचे आहे, असेही यावेळी रेहमान यांनी सांगितले.

शेखर कपूर म्हणाले, आपल्या जगण्याच्या सगळ्या बाजू या खऱ्या अर्थाने आभासी आहेत. त्या अभासालाच आपण आता नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सिनेमाच्या पडद्यावरती आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही संपूर्ण प्रक्रिया क्रांतिकारी नक्कीच असू शकते.

‘अल्गोरिदम’ जिंकू शकेल ‘ऑस्कर’

आभासी तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांचे सध्याकाळातील वाढत चाललेले प्रस्थ पाहता आणि त्यातील निपुणता पाहताना भविष्यात कदाचित असे होऊ शकेल, की सर्वोच्च पुरस्कार मानला गेलेला ऑस्कर म्हणजे अकॅडमी अवॉर्ड हा ‘अलगोरीदम’ला मिळू शकतो, अशी विलक्षण टिप्पणी प्रणव मिस्त्री यांनी केली.

आय एम द ए. आय

व्यापारी संवादामध्ये जेव्हा यांना विचारण्यात आले, अशा पद्धतीने आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता जर मानवाचे स्थान घेण्यासाठी सज्ज झाली आहे, तर भविष्यामध्ये सर काहीच बोलणार नाही, मग ए. आर. रेहमान तरी अस्सल राहणार का?

असे विचारले असता रेहमान यांनी एका दमात सांगितले की ए. आय. आणि ए. आर. हे काळानुरूप वाढत, बदलत आणि समृद्ध होत गेले आहेत. त्यामुळे आम्हा दोघांत तसे काही वेगळेपण नाही. मी स्वतच ए. आय. आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

"माझ्यासाठी संगीत हे माझ्या रिकामी मनातून आत पाझरते आणि तिथून ते बाहेर येते. कोणतीही कलाकृती परिपूर्ण होण्यासाठी रिते होणे गरजेचे असते. रिती मने विश्वाच्या कोणत्याही कोपऱ्यात एकमेकांसोबत संवाद साधतात आणि त्यातूनच कलाकृती साकार होते. त्यामुळे मन हेच माझे विश्व आहे."

- ए आर रेहमान, संगीतकार.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Social Media Ban: "आता बस्स झालं!" गोव्यात लवकरच 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी? मंत्री खंवटे घेणार केंद्रीय मंत्र्यांची भेट

Chandranath Hill Goa History: हिमालयापेक्षाही प्राचीन; गोव्यातील 'चंद्रनाथ पर्वता'चा विस्मयकारक इतिहास आणि चंद्रेश्वराचा वारसा!

Viral Video: अंधश्रद्धेचा आधार अन् फिल्मी ड्रामा; बेडवर सापाची कात सोडून गायब झालेल्या 'त्या' तरुणीचा इन्स्टावर खुलासा, म्हणाली, "नागीण बनली..."

Dabolim Airport: "दाबोळी विमानतळ बंद होणार नाही!" मुख्यमंत्री सावंतांनी ठणकावून सांगत विरोधकांची केली बोलती बंद

AUS vs ZIM: क्रिकेटचा नवा 'जायंट किलर'! झिम्बाब्वेने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला लोळवले; विश्वचषकात मोठा उलटफेर VIDEO

SCROLL FOR NEXT