Babush Monserrate |Goa News  Dainik Gomantak
गोवा

Babush Monserrate: माहिती कोणी दिली याची चौकशी करणार

Babush Monserrate: रोजगारसंबंधी माहिती नीती आयोगाला देण्यात आलेली नाही.

दैनिक गोमन्तक

Babush Monserrate: गोव्यात 1.10 लाख बेरोजगार असल्याची आकडेवारी नीती आयोगाने आपल्या अहवालात जाहीर करून चिंता व्यक्त केली आहे, परंतु ही आकडेवारी कामगार खात्याने नीती आयोगाला दिलीच नव्हती.

खात्याच्या संचालकांनी याची पुष्टी केली आहे की, त्यांनी रोजगारसंबंधी माहिती नीती आयोगाला देण्यात आलेली नाही. त्यामुळे ही माहिती नीती आयोगाला कोणी दिली याची चौकशी करणार आहे, असे स्पष्टीकरण कामगारमंत्री आतानासियो ऊर्फ बाबूश मोन्सेरात यांनी दिले आहे.

पर्वरीतील विधानसभा संकुलात ते पत्रकारांशी बोलत होते.

कामगार खात्यानेच ही माहिती दिली होती किंवा दिली असावी असे मला वाटत होते. यासंदर्भात खात्याच्या संचालकांना विचारले असता त्यांनी ती दिली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ही माहिती कोणी दिली हा प्रश्‍न अनुत्तरीत राहतो, कारण माहिती मुळात चुकीची होती.

त्यामुळे राज्याच्या छबीवर परिणाम झाला आहे. नागरिकांमध्ये चुकीचा समज निर्माण होऊ शकतो. माहिती कोणी दिली हे शोधून काढणार आहे, असे मोन्सेरात यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goan Food Culture: अळवा, वाल अन् पालक भाजीला 'वडी'ची फोडणी! कोंकणी खाद्यसंस्कृतीचा चेहरा बदलणारा एक पारंपारिक पदार्थ

Goa Education: अनुदानित शाळांतील विद्यार्थी संख्‍येत घट; विनाअनुदानित शाळांतील संख्‍येत मात्र सातत्‍याने होतेय वाढ

'Telegram'ला 15 दिवसांचा अल्टिमेटम! चित्रपट आणि OTT कंटेंटप्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका, पायरसीविरोधात मोठं पाऊल

Goa Solar Scheme: राज्याची सौर अनुदान योजना रखडली; शेकडो अर्जदार प्रतीक्षेत, 3 वर्षे मुदतवाढीची अधिसूचना अद्याप नाही

Goa Education: 3 वर्षांपासून निधीअभावी अडचणीत असलेल्या 'बाल हक्क आयोगा'ला अखेर सरकारी अनुदान; 'गोमन्तक'च्या वृत्ताची प्रशासनाकडून तातडीने दखल

SCROLL FOR NEXT