National Women's Football Dainik Gomantak
गोवा

National Senior Women's Football: गोवा गोलबरोबरीसह स्पर्धेबाहेर

राष्ट्रीय सीनियर महिला फुटबॉल ः ओडिशाने रोखले, हिमाचल अव्वल स्थानी

गोमन्तक डिजिटल टीम

National Senior Women's Football अखेरच्या साखळी लढतीत गोव्याला ओडिशाविरुद्ध 1-1 गोलबरोबरीवर समाधान मानावे लागले. त्यामुळे 27 व्या राष्ट्रीय सीनियर महिला फुटबॉल स्पर्धेत त्यांना मुख्य फेरी गाठण्यास अपयश आले. हिमाचल प्रदेशने आंध्र प्रदेशचा 19-1 असा धुव्वा उडवून गट तीनमध्ये अव्वल स्थान मिळविले.

स्पर्धेच्या गट तीन साखळी फेरीतील सामने रविवारी फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाले. सकाळच्या सत्रात हिमाचल प्रदेशने दणदणीत विजय नोंदविल्यामुळे त्यांचे पारडे जड राहिले.

अंजू हिने सात, पूनमने चार, मनीषाने तीन, रिया शर्मा व नकेता यांनी प्रत्येकी दोन, तर निशा हिने एक गोल नोंदवत हिमाचल प्रदेशला तिसरा विजय मिळवून दिला. त्यांचे चार लढतीनंतर 10 गुण झाले.

गोमंतकीय प्रशिक्षक वामन च्यारी यांच्या मार्गदर्शनाखालील हिमाचल प्रदेशने स्पर्धेत सर्वाधिक 41 गोल नोंदविले, तर फक्त चार गोल स्वीकारले. आंध्र प्रदेशला तिसरा पराभव पत्करावा लागला, त्यामुळे चार लढतीनंतर त्यांचे तीन गुण कायम राहिले. त्यांच्यासाठी एक मात्र गोल कोल्लुरू अनुराधा हिने केला.

यजमान संघ गटात तिसरा

ओडिशाविरुद्ध कॅरेन एस्ट्रोसियो हिने 45 व्या मिनिटास गोव्याला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर 65 व्या मिनिटास सत्यबती खाडिया हिने ओडिशासाठी बरोबरीचा गोल केला. दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला.

ओडिशाचे चार लढतीनंतर आठ गुण झाले व त्यांना गट तीनमध्ये दुसरा क्रमांक मिळाला. दोन विजय, एक बरोबरी व एक पराभव अशा कामगिरीसह सात गुण नोंदवून गोव्याचा संघ तिसऱ्या क्रमांकावर कायम राहिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT