Umawati Gadekar Dainik Gomantak
गोवा

Goa: मांद्रेतील उमावती गडेकर यांच्या घराविषयी 'जैसे थे' चा आदेश

उमावती गडेकर (Umawati Gadekar) यांनी आपल्याला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा केला.

दैनिक गोमन्तक

मांद्रे जुनासवाडा (Mandre Junaswada) येथील रीवा रेसोर्ट (Rewa Resort) आपल्याला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा स्थानिक श्रीमती उमावती गडेकर (Umawati Gadekar) उर्फ मांद्रेकर यांनी करून मामलेदार न्यायालयात मुंडकार कायद्याखाली अर्ज दाखल केला आहे. त्यावर संयुक्त मामलेदार प्रियांका कामत (Priyanka Kamat) यांच्याशी सुनावणी होवून जैसे थे असा अंतरिम आदेश दिला आहे.

उमावती गडेकर (Umawati Gadekar) यांनी आपल्याला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा केला. रीवा रेसोर्ट प्रा. लिमिटेड हॉटेलच्या परिसरात श्रीमती उमावती गडेकर यांचे जुने घर आहे व त्यांच्या घरा संबधात पेडणे मामलेदार येथे मुंडकार कायद्या अंतर्गत अर्ज दाखल केला आहे . दरम्यानच्या काळात रीवा रेसोर्ट याने घरच्या परिसरात बांधकाम करीत आहेत तसेच इतर त्रासदायक अडचणी निर्माण करत आहेत. आपण घर सोडून जावे यासाठी ते त्रास देतात सरकारने आपल्याला संरक्षण द्यावे अशी विनंती तिने न्यायालायाकडे केली आहे.

पेडणे संयुक्त मामलेदार यांनी जैसे थे परिस्थिती ठेवण्याचा आदेश दिला आहे. पुढील सुनावणी ७ जुलै रोजी ठेवण्यात आली आहे , न्यायालयाच्या आदेशां प्रमाणे आपल्याला तात्पुरता संरक्षण मिळालेले आहे. रीवा रेसोर्ट च्या विरोधात आपण गेल्या दोन वर्षापासून लढत आहोत . आपले कुटुंब जागेतील पुरातन मुंडकार आहोत व रेवा रेसोर्ट ने हल्लीच जमीन विकत घेतली आहे . पाणी वाट व जागेवरून आपला लढा चालूच राही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

फोटोला द्या 80s चा Retro Look! ChatGPT चे हे भन्नाट Prompts वापरा, काही सेकंदांत बदलेल संपूर्ण लूक

Nepal Flood: पीडितांचे हात सरसावले पूरग्रस्तांच्या मदतीला; आसाम, नेपाळसाठी 3 टन मदतसामग्री गोव्‍यातून रवाना

IND vs PAK: रविवारी ठरणार सुपर संडे! आशिया कपच्या फायनलमध्ये भारत-पाकिस्तान भिडणार? चाहत्यांसाठी पर्वणी

Bicholim Traffic Restrictions: डिचोलीत चतुर्थी बाजाराची लगबग; शनिवारपासून वाहनांना 'नो एंट्री'! सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत वाहतुकीवर निर्बंध

Sadetod Nayak: काँग्रेस युतीसाठी प्रयत्नशील, आता गोवा फॉरवर्डनेही स्पष्ट भूमिका घेण्याची गरज

SCROLL FOR NEXT