सोमवार (ता.६) आणि मंगळवारी (ता.७) राज्यात ‘ऑरेंज अलर्ट’ (Orange Alert) जारी करण्यात आला असून या दोन दिवसांत मुसळधार पावसाची (Rain) शक्यता आहे.  Dainik Gomantak
गोवा

Goa: राज्यात पुढील दोन दिवस ‘ऑरेंज अलर्ट’ जारी, अतिवृष्टीचा इशारा

नागरिकांसह मच्छीमारांनी दक्षता घेण्याची गरज आहे. प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाय (Preventive measures) आणि मदतकार्य (Help) याची तयारी ठेवावी असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: तब्बल महिनाभरानंतर पुन्हा एकदा राज्यात अतिवृष्टीची (Heavy rain) शक्यता हवामान वेधशाळेने (The weather observatory) व्यक्‍त केली आहे. सोमवार (ता.६) आणि मंगळवारी (ता.७) राज्यात ‘ऑरेंज अलर्ट’ (Orange Alert) जारी करण्यात आला असून या दोन दिवसांत मुसळधार पावसाची (Rain) शक्यता आहे.

गेल्या महिनाभरात राज्यात पावसाचा वेग मंदावला होता. तब्बल ४९ टक्के पावसाची तूट झाली होती. आता मात्र पावसाने जोर धरला असून पुढील दिवसांत तो वाढण्याची शक्यता आहे. शुक्रवारी वेधशाळेने सोमवारपर्यंत ‘यलो अलर्ट’ घोषित केला होता. त्यामुळे नागरिकांना सुट्टीचे नियोजन जपून करावे लागणार आहे. आज शनिवारी (ता. ४) राज्याच्या बहुतेक भागात दमदार पावसाने हजेरी लावली. दोन दिवसांपूर्वी पावसाच्या सरासरीत २ टक्क्यांची घट होती, ती आता एक टक्क्यावर आली आहे.

शुक्रवारी झालेला पाऊस (मि.मी.मध्ये)

म्हापसा- ६५.०, पेडणे- ३५.४, फोंडा- ४०.८, पणजी, ३१.०, जुने गोवा- ७१.६, साखळी- १५.०, काणकोण- ३९.०, मडगाव- ४८.२, मुरगाव- २०.६, केपे- ५०.२, सांगे- ४२.१

पेडणे अव्वल

मान्सूनला सुरवात होऊन आज रविवारी (ता.५) तीन महिने पूर्ण होताना पेडणे पर्जन्यमापन केंद्रावर सर्वाधिक १३५.२ इंच पावसाची नोंद झाली आहे. तर मुरगाव केंद्रात निच्चांकी ८५.४ इंच नोंद झाली आहे. म्हापसा येथे १००.०, फोंडा १०२.८, पणजी ९७.८, जुने गोवा १०७.९, साखळी ११०.८, वाळपई १२२.९, काणकोण ९४.६, दाबोळी ८६.१, मडगाव १०९.१, केपे ११८.६, सांगे ११३.४ इंच पावसाची नोंद झाली आहे.

आंध्रप्रदेश ते ओडिशादरम्यान कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असल्‍याच्‍या पार्श्‍वभूमीवर राज्‍यात येत्या काही दिवसात अतिवृष्टीची शक्यता आहे. याकाळात नागरिकांसह मच्छीमारांनी दक्षता घेण्याची गरज आहे.

- एम.राहुल, प्रभारी संचालक, वेधशाळा, पणजी

सतर्क राहण्याचे आदेश

४८ तासांत मुसळधार पाऊस पडण्याच्या हवामान खात्याच्या इशाऱ्यामुळे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी प्रशासनाला सतर्क राहण्याचा आदेश दिला आहे. प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाय आणि मदतकार्य याची तयारी ठेवावी असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी उत्तर गोवा नियंत्रण कक्षाशी ०८३२२२२५३८३ आणि दक्षिण गोवा नियंत्रण कक्षाशी ०८३२२७९४१०० या क्रमांकावर संपर्क साधावा असे मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवर म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

SCROLL FOR NEXT