Congress Office Dainik Gomantak
गोवा

Goa: आमदार बेंजामिन सिल्वा यांच्या कॉंग्रेसमधील प्रवेशाला कॉंग्रेसमधूनच विरोध

असा सवाल प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar) आणि विरोधी पक्षनेते दिगंबर कामत याना विचारण्यात आला.

दैनिक गोमन्तक

मडगाव: वेळ्ळीचे माजी आमदार बेंजामिन सिल्वा (Benjamin Silva) याना काँग्रेसमध्ये (Congress) घेण्यास एका गटाचा तीव्र विरोध असून त्याचे पडसाद आज त्यांच्या प्रवेशाच्यावेळी उमटले. वेळ्ळीतील काँग्रेस तिकिटाचे आणखी एक दावेदार सावियो डिसिल्वा (Savio D'silva) यांच्या समर्थक गटाने आज दक्षिण गोवा काँग्रेस कार्यालयात धुमाकूळ घालत ज्याने आतापर्यंत फक्त काँग्रेस विरोधीच काम केले त्या बेंजामिन सिल्वा यांना पक्षात घेतलेच जाते कसे असा सवाल प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar) आणि विरोधी पक्षनेते दिगंबर कामत याना विचारण्यात आला. यावेळी काँग्रेस कार्यालयात बेंजामिन आणि सावियो यांच्या समर्थकांमध्ये एक प्रकारचे धुमशान माजले.

काँग्रेसचे जिल्हा पंचायत सदस्य ज्युलिओ फेर्नांडिस यांनी यावेळी बेंजामिन सिल्वा याना काँग्रेस पक्षात प्रवेश देऊन वेळ्ळीत काँग्रेस संपविण्याचा हा प्रयत्न असे सांगितले. तर काँग्रेस सेवादलच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष आंतोनेत डायस यांनी वेळ्ळीतील काँग्रेस दिगंबर कामत आणि गिरीश चोडणकर हे खिळखिळी करायला उठले आहेत असा आरोप केला.

आज सिल्वा याना काँग्रेस पक्षात प्रवेश देण्याचा सोहळा मडगाव कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. यावेळी कामत, चोडणकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT