Opposition Press 
गोवा

...तर आगामी अधिवेशनावर बहिष्कार; युरी म्हणतात म्हादई, बेरोजगारीवरुन सरकारला उघडे पाडणार

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अर्बन नक्षलवाद्यांची नावे जाहीर करून त्यांच्यावर कारवाई करावी सातही आमदारांची मागणी.

Pramod Yadav

Goa Budget Session 2024: सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये प्रश्नांचे समान वाटप करण्याची लॉट पद्धत बंद केलीय. याबाबत सभापतींची भेट घेणार असून हा प्रकार थांबला नाही तर आगामी विधानसभेच्या अधिवेशनावर बहिष्कार टाकू, असा इशारा विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी दिला आहे.

सातही विरोधी आमदारांच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आलेमाव बोलत होते.

भाजप सरकारने विधानसभा अधिवेशनाचा कालावधी कमी केला, त्यांनी उप प्रश्न देखील कमी केले आहेत. आता तर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये प्रश्नांचे समान वाटप करण्याची लॉट पद्धत बंद केल्याचे आलेमाव यांनी नमूद केले.

तसेच, आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी आमदार संघटितपणे सरकारला घेरून, म्हादई, बेरोजगारी, आपत्कालीन यंत्रणा यासारख्या विषयांवरून सरकारला उघडे पाडणार असल्याचे आलेमाव म्हणाले.

अर्बन नक्षलवाद्यांमुळे राज्यातील सामाजिक सलोखा नष्ट होऊ शकतो. त्यामुळे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अर्बन नक्षलवाद्यांची नावे जाहीर करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणीही सातही आमदारांनी केली.

गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय सरदेसाई यांनी त्यांचा पक्ष आगामी लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच, इंडिया आघाडीत सहभागी व्हायचे का नाही याबाबत आपल्याशी आघाडीतील नेत्यांनी संपर्क साधलेला नाही त्यामुळे याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही, असे सरदेसाई यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, येत्या 2 फेब्रुवारीपासून विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन बोलावण्यात आले आहे. 6 दिवसीय अधिवेशन 9 फेब्रुवारीला समाप्त होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Recruitment: तरुणांसाठी खुशखबर! निवड आयोगामार्फत 285 रिक्त जागांसाठी जाहिरात; 'या' पदांसाठी मागवले अर्ज

Vedanta Mining Dispute: पिळगावात दुसऱ्या दिवशीही खनिज वाहतूक बंद; शेतकरी मागणीवर ठाम

IFFI 2024: 'भूमी'चे गोमंतकीयांबद्दल गौरवोद्गार! म्हणाली की, लैंगिक भेदाकडे पाहण्याची दृष्टी...

Goa Crime: पुत्रविरहामुळे व्यथित होऊन 'त्याने' संपवले जीवन! सुसाईड नोटमध्ये केला पत्नी आणि तिच्या प्रियकरावर आरोप; Video मध्ये म्हणाला की...

Goa BJP: भाजप नेत्‍यांना पक्षशिस्‍त पाळण्याच्या सूचना! Cash For Job वर जाहीर वाच्‍यता नको; गाभा समितीच्या बैठकीत घमासान

SCROLL FOR NEXT