Yuri Alemao Daink Gomantak
गोवा

Mahadayi Water Dispute: ...मग कर्नाटकच्या डीपीआरला मंजुरी कशी दिली? आलेमाव यांची पर्यावरण मंत्र्यांवर टीका

म्हादईप्रश्नी अभ्यासाअंती निर्णय घेऊ, असे वक्तव्य केंद्रीय पर्यावरण मंत्री यांनी केले होते

गोमंतक ऑनलाईन टीम

Mahadayi Water Dispute: म्हाईदबाबत शास्त्रोक्त अभ्यास करून निर्णय घेऊ, असे वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय पर्यावर मंत्री भूपेंद्रसिंग यादव यांच्यावर राज्याचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी टीका केली आहे. अभ्यास करून निर्णय घेणार असाल तर मग कर्नाटकच्या डीपीआरला मंजुरी कशी दिली? असा सवालही आलेमाव यांनी केला.

भाजप सरकारवर टीका करताना युरी आलेमाव म्हणाले की, राज्यातील भाजप सरकार हे घोटाळेबाज सरकार आहे. हे सरकार केवळ इव्हेंट मॅनेजमेंट करण्यात गुंतलेले आहे. नोकरी देण्याच्या नावाने घोटाळा केला.

सरकारने केलेला जॉब फेयर पुर्णतः फसला. हजारो बेरोजगोर तरूण तिथे गेले होते. पण त्यांचा भ्रमनिरास झाला. म्हादईसाठी आम्ही बैठक घेतली. तो आमचा लोकशाही हक्क आहे. पण त्याची परवानगी रद्द करण्याचा प्रयत्न केला.

राज्यात म्हादईचा विषय धगधगत असतानाच केंद्रीय वन, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्रसिंग यादव गोव्याच्या दौऱ्यावर आले. कोणत्याही अभयारण्यात मोठे प्रकल्प राबवणे, पाणी वळवणे, यासारख्या बाबी वन कायदा 1972 कलम 29 याचे उल्लंघन आहे. ही बाब पत्रकारांनी लक्षात आणून दिल्यानंतरही मंत्री यादव यांनी उत्तर देणे टाळले.

मंत्री यादव म्हणाले होते की, जेव्हा हा मुद्दा पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयासमोर येईल, तेव्हा आम्ही वस्तुस्थितीचा शास्त्रोक्त अभ्यास करू आणि त्यानंतरच यावर निर्णय घेऊ. मी तज्ज्ञ नाही. वैज्ञानिक तथ्ये आणि तज्ज्ञांच्या मतांवर निर्णय घेतला जाईल, असे सांगत त्यांनी या विषयावर जास्त बोलणे टाळले होते.

दरम्यान, काही दिवसांपुर्वीच बेळगाव येथील सभेत बोलतान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तर कर्नाटकातील शेतकऱ्यांना पाणी मिळावे, यासाठी आम्ही म्हादईचे पाणी वळवण्यासाठी परवानगी दिल्याचे जाहीर भाष्य केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT