Yellow Alert High Tide Alert  Dainik Gomantak
गोवा

Goa Weather Update: पाच दिवस ‘यलो अलर्ट’; किनाऱ्यावर उसळणार अडीच मीटर उंच लाटा

Goa Weather Update: गोवा वेधशाळेने पाच दिवस मध्यम स्वरूपातील पावसाची शक्यता वर्तवली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Weather Update: राज्यात पावसाचा जोर मंदावला असला तरीदेखील पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हे दिसत आहेत. राज्यात पुढील पाच दिवस मध्यम स्वरूपातील पावसाची शक्यता वर्तवत गोवा वेधशाळेने ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.

तसेच भारतीय महासागर सूचना सेवा केंद्राने शापोरा ते पणजी (Panjim) तसेच वास्को ते कोळंब भागातील समुद्रात उद्या (गुरुवारी) दुपारी २.३० च्या सुमारास दोन ते अडीच मीटर उंचीच्या लाटा उसळणार असल्याचे म्हटले आहे.

राज्यात मागील २४ तासांत केवळ १६.५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. मागील २४ तासांत सर्वाधिक ७२.२ मिमी पावसाची नोंद मुरगाव येथे करण्यात आली, असून त्याखालोखाल दाबोळी २०.६ मिमी, मडगाव १९.७ मिमी, पेडणे १६.४ मिमी, साखळी १५.८ मिमी, म्हापसा १३ मिमी, केपे १२ मिमी, वाळपई ८.९ मिमी, पणजी ८.५ मिमी, सांगे ७.१ मिमी, जुने गोवे ३.४ मिमी, फोंडा २.८ मिमी, काणकोण २.२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.

आज पणजी येथे कमाल ३२.३ तर किमान २५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. राज्यात सर्वाधिक ९८ टक्के आर्द्रतेची नोंद करण्यात आली.

...तर पाऊस इंचांची विशी ओलांडणार

राज्यात आतापर्यंत एकूण ४७२ मिमी म्हणजेच १८.५० इंच पावसाची नोंद करण्यात आली आहे. जर गुरुवारी राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला तर एकूण २० इंच पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे. राज्यात आतापर्यंत ५३२ मिमी पाऊस होणे अपेक्षित होते; परंतु सरासरी पावसाच्या तुलनेत राज्यात ११.४ टक्के पावसाची कमतरता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT