Nuvem Viral Video Dainik Gomantak
गोवा

Nuvem: सोनं गोळा करण्यासाठी धावले लोक, पण... नुवे महामार्गावरील अजब घटना; नंतर झाला खुलासा

Nuvem Viral Video: शनिवारी दुपारी नुवे महामार्गावर चकीत करणारे दृश्य पाहायला मिळाले. लोक अचानक आपली वाहने रस्त्याच्या कडेला थांबवून महामार्गावर पडलेले गोळे गोळा करण्यासाठी धावले. सुरुवातीला हे गोळे सोन्याचे असल्याचा अंदाज वर्तवला जात होता.

Manish Jadhav

नुवे: सोशल मीडियावर सध्या गोव्यातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ नुवे येथील असल्याचे सांगितले जात आहे. शनिवारी (17 मे) हा व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये नुवेतील महामार्गाच्या कडेला पडलेले गोलाकार गोळे गोळा करण्यासाठी लोक धावताना दिसत आहेत. लोकांच्या या विचित्र वर्तनामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली.

काय आहे नेमकं प्रकरण?

दरम्यान, शनिवारी दुपारी नुवे महामार्गावर चकीत करणारे दृश्य पाहायला मिळाले. लोक अचानक आपली वाहने रस्त्याच्या कडेला थांबवून महामार्गावर पडलेले गोळे गोळा करण्यासाठी धावले. सुरुवातीला हे गोळे सोन्याचे (Gold) असल्याचा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, अधिक तपासणी केल्यानंतर हे गोळे लोखंडी धातूचे असल्याचे निष्पन्न झाले. अचानक लोक रस्त्यावर उतरताच गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

वाहतूक विस्कळीत

गोलाकार गोळे सोन्याचे असल्याचे समजून लोकांनी महामार्गावर आपली वाहने थांबवली, ज्यामुळे संपूर्ण परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्यांच्या अशा वर्तनामुळे महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाली. याचा फटका महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या इतर प्रवाशांना बसला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT