Illegal Construction Dainik Gomantak
गोवा

Illegal Construction: नेरूल पंचायतीकडून अनधिकृत रस्ता बांधकामावर निर्बंध; सरपंचांचा कठोर कारवाईचा इशारा

Illegal Construction- अनधिकृत बांधकामाला चाप घाला, स्थानिकांची विनंती

Ganeshprasad Gogate

Illegal Construction नेरूल पंचायतीने गावातील विनापरवाना रस्ता बांधकामावर कारवाई केल्याची माहिती प्राप्त झालीय. नेरूल गावचे सरपंच राजेश कळंगुटकर यांनी गोवा पंचायत राज कायदा 1994 च्या कलम 64/1 (जे) अंतर्गत व्ही. वेंकट कृष्णा रेड्डी आणि सौ. व्ही. व्ही. गोवरी यांना सुरु केलेले काम थांबवण्याचा आदेश जारी केला आहे.

यासंबंधी मिळालेल्या माहिती नुसार नेरूल गावातील सर्व्हे क्रमांक 113/11 मध्ये अनधिकृतपणे रस्त्याचे बांधकाम केल्याची तक्रार प्रकाश जाधव यांनी दाखल केली होती.

या तक्रारीची दखल घेत सरपंचांनी व्ही. वेंकट कृष्णा रेड्डी आणि व्ही. व्ही. गोवरी यांना चाललेले बांधकाम थांबवण्याचे आदेश दिले असून 26 डिसेंबर रोजी सकाळी 11:00 वाजता दोघांनाही पंचायत कार्यालयात सरपंचासमोर हजर राहण्यासाठीचे आदेश देण्यात आले आहे.

तसेच त्यांनी त्यांच्या बांधकामाची कायदेशीरता सिद्ध करण्यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे सोबत आणण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

दरम्यान त्यांनी दिलेल्या आदेशाचे पालन न केल्यास तसेच संबंधित दस्तऐवजात कोणतीही अफरातफर तसेच बेकायदेशीरता आढळल्यास त्यांच्यावर गोवा पंचायत राज कायदा, 1994 अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही सरपंचांकडून सांगण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT