Dainik Gomantak
गोवा

Goa Nightclub Fire: धुरात गुदमरून मृत्यू जवळ आला होता, पण... 'तो' माणूस देवासारखा धावून आला! हडफडे क्लबमधील कझाक डान्सरने सांगितली आपबिती

Kristina Sheikh Kazakh Dancer: गोव्यातील हडफडे नाईट क्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेतून बचालेली कझाक नृत्यांगना क्रिस्टिना हिने आपला थरारक अनुभव सांगितलाय.

Akshata Chhatre

Kristina Sheikh belly dancer story: गोव्यातील हडफडे नाईट क्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेतून बचालेली कझाक नृत्यांगना क्रिस्टिना हिने आपला थरारक अनुभव सांगितलाय.आग लागण्याच्या केवळ काही मिनिटांपूर्वी क्लबमध्ये नृत्य सादर करणाऱ्या क्रिस्टिनाने सांगितले की, या प्रकाराला नियतीने क्रूर विनोदच म्हणावा लागेल, ज्यामुळे तिचे आयुष्य क्षणात बदलले.

'संगीत थांबले, धुराचा लोट पसरला'

क्रिस्टिना या क्लबमध्ये पाहुण्यांचे मनोरंजन करण्यासाठी आली होती. तिने सांगितले की, मध्यरात्रीचा तो क्षण भयभीत करणारा ठरला. ती नृत्य सादर करत असतानाच वातावरणात अचानक बदल झाला; लाईट्स गेले, संगीत एकदम थांबले आणि लगेचच एक वेळच वास पसरू लागला. यानंतर काही सेकंदांतच धुराचा दाट लोट स्टेजवर पसरला आणि नीट दिसणे किंवा श्वास घेणेही कठीण झाले.

धुरात 'स्टँपीड' आणि गोंधळ

क्रिस्टिनाच्या म्हणण्यानुसार, गर्दीच्या प्रतिक्रियेमुळे क्लबमध्ये चेंगराचेंगरी सारखी परिस्थिती निर्माण झाली. ती पूर्णपणे गोंधळली आणि श्वास कोंडल्यामुळे तिला धूर कुठून येत आहे हे समजत नव्हते. "सर्व काही गोंधळात पडले. लोक सर्व दिशांनी धावत होते आणि ओरडण्याचे आवाज येत होते, पण काहीही समजत नव्हते." क्लबमधून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नव्हता. अशा वेळी, मदतीला बॅकस्टेज टीममधील एक सदस्य धावून आला.

कर्मचाऱ्यामुळे वाचला जीव

"टीममधील एकाने माझा हात पकडला आणि एका कॉरिडॉरकडे खेचले. मला नाही वाटत की मी स्वतःहून बाहेर पडण्याचा मार्ग शोधू शकले असते," असे क्रिस्टिनाने सांगितले. त्या कर्मचाऱ्यामुळेच त्यांचा जीव वाचला. क्लबच्या बाहेर आल्यावर, काही मिनिटांपूर्वी आपण जिथे नृत्य करत होतो, त्या इमारतीला आगीच्या ज्वाळांनी वेढलेले पाहून ती हादरली आणि जमिनीवर कोसळली, अंगाला कंप सुटला होता.

क्षणभर उशीर झाला असता, तर...

आग लागल्याचे समजताच लोक जीवाच्या आकांताने बाहेर पळू लागले. स्टाफ मदतीला धावत आला. लोक एकमेकांना हात देत होते, परंतु त्या क्षणी कुणालाही वाटले नव्हते की एवढ्या झपाट्याने सर्व काही बदलणार..पहिल्यांदा चेंजिंग रूममध्ये जावे असे मला वाटले, पण माझ्या क्र्यू मेंबरने मला तिकडे जाऊ दिले नाही. कदाचित त्याच क्षणी माझा जीव वाचला असावा. नाहीतर, मीही धुरात गुदमरून मृत्यूमुखी पडले असते.

घरी पोहोचल्यावर मी मुलीला घट्ट मिठी मारली आणि परमेश्वराला धन्यवाद दिले. हा माझा त्या दिवसाचा दुसरा परफॉर्मन्स होता, अशी प्रतिक्रीया बेली डान्सर क्रिस्टिना शेख यांनी एका वृत्तसंस्थेला दिली आहे. कझाकिस्तानची ही प्रोफेशनल डान्सर गोव्यातील आगीच्या घटनेनंतर समाजमाध्यमावर चर्चेत आली आहे.

'आयुष्य किती लवकर बदलू शकते!'

नंतर जेव्हा तिला तिच्या नृत्याचा व्हायरल व्हिडिओ दाखवण्यात आला, तेव्हा तिला ते अविश्वसनीय वाटले. "जे काही घडणार होते ते माहीत असूनही स्वतःला नाचताना पाहणे खूप धक्कादायक होते. यामुळे मला जाणवले की आयुष्य किती लवकर बदलू शकते," असे ती म्हणाली. क्रिस्टिनाने या घटनेत वाचलेल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली असून, ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांप्रती तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Casino Crackdown: कोट्यवधींचा महसूल थकवणाऱ्या दोन बड्या कॅसिनोंना सरकारचा दणका! परवाने केले तत्काळ रद्द; वारंवार नोटीस देऊनही मालकांचं उत्तर नाही

Romeo Lane Illegal Shack: हडफडे घटनेनंतर सरकार 'ॲक्शन मोड'मध्ये! दोन कॅसिनोंचे परवाने रद्द, तर रोमिओ लेनच्या बेकायदा बांधकामावर हातोडा

Horoscope: तुमच्या इच्छा पूर्ण होतील! 'या' राशींचे नशीब चमकणार, जाणून घ्या संपूर्ण भविष्य!

IND vs SA T20: तिलक वर्मानं लगावला 89 मीटरचा गगनचुंबी षटकार, चेंडू थेट स्टेडियमच्या बाहेर; व्हिडिओ पाहून क्रिकेटप्रेमी थक्क!

जबरदस्त डाइव्ह मारली, पण नशिबानं साथ दिली नाही, 'तो' थरारक रनआऊट पाहून धोनीच्या आऊटची आठवण ताजी; VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT