Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa News: रस्त्यावरील भटक्या जनावरांच्या भांडणात गर्भवती जखमी; पर्वरीतील प्रकार

गोमॅकोमध्ये दाखल; महिलेसोबतचे मूल सुखरूप

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa News: गोव्यात भटक्या जनावरांमुळे वाहनधारकांसह पादचाऱ्यांना नेहमी समस्या निर्माण होत असतात. नुकतेच एक गर्भवती भटक्या जनावरांच्या भांडणात जखमी झाली आहे. पर्वरीतील मॉल दी गोवा जवळ मुख्य रस्त्यावर बुधवारी रात्री साडे दहाच्या सुमारास हा प्रकार घडला आहे.

रस्त्याच्या कडेने ही महिला जात होती. तेव्हा रस्त्यावर दोन भटक्या गाईंमध्ये जुंपली. त्यातून एकमेकांना रेटत या गाई या महिलेच्या दिशेने आल्या. त्यातून या महिलेला दुखापत झाली आहे. ही महिला गर्भवती आहे.

सुदैवाने या महिलेसोबत असलेल्या तिच्या मुलाला मात्र काहीही झालेले नाही. जखमी झालेल्या महिलेला तातडीने बांबोळीतील गोमॅको रूग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे तिच्यावर उपचार केले जात आहेत.

दरम्यान, भटक्या जनावरांमुळे अपघातांचे प्रकार घडत असतात. त्यातच आता भटक्या गुरांच्या भांडणात महिला जखमी झाल्याने भटक्या जनावरांच्या प्रश्नाने पुन्हा डोके वर काढले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Of Baroda Cyber Attack: बँक ऑफ बडोदावर सर्वात मोठा सायबर हल्ला? 1 टीबी संवेदनशील डेटा डार्क वेबवर लीक; ग्राहकांची धडधड वाढली

Dharmendra Pradhan Reaction: "मी 'स्ट्रीट फायटर', एसी रुममध्ये बसणारा नाही!", राजीनाम्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांची पहिली प्रतिक्रिया; जुन्या आठवणींना दिला उजाळा

क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच! अंपायरनं रनआऊट दिलं, तरीही फलंदाजानं सुरु ठेवली फलंदाजी; 'तो' निर्णय ठरला सामन्याचा टर्निंग पॉइंट Watch Video

Bihar Bandh Violence: बिहार बंददरम्यान विद्यार्थ्यांवर थेट 'एके-47' ने गोळीबार! पोलिसांचा अमानुष चेहरा कॅमेऱ्यात कैद; एसआयटी जवान डिस्मिस

America New Visa Policy: ऑनलाईन फ्रॉड अन् सेक्सटॉर्शन करणाऱ्यांना झटका! अमेरिकन नागरिकांना लुटणाऱ्या चिनी गँगवर निशाण्यावर; ट्रम्प सरकारची नवी व्हिसा पॉलिसी जाहीर

SCROLL FOR NEXT