Goa Live Updates Dainik Gomantak
गोवा

Goa News: सावर्डे ट्रक मालकांची डंप धोरण पुनरुज्जीवित करण्याची मागणी

Goa Today's News Live Update's In Marathi: गोव्यातील राजकीय, गुन्हे, कला - क्रीडा - संस्कृती, पर्यटन यासह विविध क्षेत्रात घडणाऱ्या ताज्या घडामोडी.

Sameer Amunekar

Rama Kankonkar: काणकोणकरांचे आरोप राजकीयदृष्ट्या प्रेरित - दामू नाईक

रामा काणकोणकर यांचे आरोप तथ्यहिन आणि राजकीयदृष्ट्या प्रेरित आहेत. सरकार आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची प्रतिमा मलिन करण्याचे काणकोणकरांचे प्रयत्न असल्याचं दामू नाईक यांनी म्हटलंय.

आयुष रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर आग

धारगळ येथील आयुष रुग्णालयात रविवारी सकाळी लागलेल्या आगीची घटना समोर आली आहे. रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर वॉशिंग मशीन वापरत असताना शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

South Goa: द. गोव्यात मंगळवार, बुधवारी मर्यादित पाणी

साळावली येथील जलशुद्धीकरण प्रकल्प आणि जलवाहिनी प्रकल्पाच्या देखभाल आणि दुरुस्तीचे काम १३ ऑक्टोबर रोजी हाती घेण्यात येणार होते. मात्र, सोमवारी कोलवा येथे प्रसिद्ध फाम उत्सव असल्याने आता मंगळवारी (ता. १४) हे काम करण्यात येणार आहे. या दुरुस्ती कामानिमित्त प्रकल्प १४ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याने १४ व १५ रोजी मर्यादित पाणी राहील.

Navelim: मटकाप्रकरणी नावेलीत दोघांना अटक

नावेली येथे मटका घेताना मडगाव पोलिसांनी दोघांना पकडले. जितेंद्र कुमार व बाबूश हरिजन अशी संशयितांची नावे असून, अटक करून नंतर त्यांना जामिनावर सोडले. जितेंद्रकडे १,४१० तर बाबूशकडे ५३० रुपये सापडले. जुगार प्रतिबंधात्मक कायद्याखाली त्यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे.

Mapusa: अपघात करून पळ काढणाऱ्या कारचालकाविरुद्ध गुन्हा नोंद

कळंगुट येथे निष्काळजीपणे वाहन हाकून अपघातानंतर जखमींना उपचाराची व्यवस्था किंवा पोलिसांना माहिती न पुरविताच, घटनास्थळावरून पळ काढल्याप्रकरणी पोलिसांनी विजय सोनू बुरूड (रा. ठाणे, मुंबई) या बीएमडब्ल्यू कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

बेळगावात मंगळसूत्राची चोरी

कर्नाटकातील बेळगाव येथील पर्यटक या पोलिस ठाण्यात आली आणि तिने सांगितले की तिचे ४,५०,००० रुपये किमतीचे सोने (मंगळसूत्र) बागाच्या रस्त्यावर कुठेतरी पडले आहे. त्यानुसार, पीएसआय योगेश, स्नेहल, सायल, पोलिस कॉन्स्टेबल अभिषेक आणि पोलिस कॉन्स्टेबल सिद्धार्थ यांनी तातडीने कारवाई केली ज्यामुळे पर्यटकाचे सोने सापडले आणि ते योग्य मालकाला सुपूर्द करण्यात आले.

रामांच्या 'बोलवत्या धन्या'ला शोधा : भाजप

सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावर झालेला हल्ला दुर्दैवीच. पण, त्यांनी जे आरोप केलेले आहेत त्यामागे त्यांचा 'बोलवता धनी कोण?' याचा शोध पोलिसांनी घेणे गरजेचे : सुभाष शिरोडकर, मंत्री

मोपा विमानतळासाठी ज्यांच्या जमिनी संपादन, पुढील सुनावणी २० नोव्हेंबर २०२५

गोव्यातील मुंबई उच्च न्यायालयाने मोपा विमानतळासाठी ज्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या, त्या १६५ टॅक्सी मालकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शिव वॉरियर्स युनायटेड टॅक्सी असोसिएशनला राज्याच्या वाहतूक व्यवसायाशी संबंधित प्रमुख याचिकांमध्ये हस्तक्षेप करण्याची परवानगी दिली आहे आणि पुढील सुनावणी २० नोव्हेंबर २०२५ रोजी निश्चित केली आहे.

नेसाई आयडीसीमध्ये कचरा टाकताना उत्तर प्रदेशातील एक रहिवासी पकडला

नेसाई आयडीसीमध्ये कचरा टाकताना उत्तर प्रदेशातील एक रहिवासी पकडला गेला; स्थानिकांनी त्याला कचरा साफ करायला लावला

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एस सी समाज संमेलन आयोजित

मांद्रे आमदार जीत आरोलकर मांद्रे उदरगत संस्था व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एस सी समिती मांद्रे तर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एस सी समाज संमेलन मांद्रे दीनदयाळ सभागृहामध्ये आयोजित करण्यात आले होते. या संमेलनामध्ये हास्य चित्रपट अभिनेते पृथ्वीराज प्रताप कांबळे आमदार जीत आरोलकर एस सी समाज संस्थेचे अध्यक्ष रामनाथ पवार चोपडे आगरवाडा सरपंच हेमंत चोपडेकर आधी उपस्थित होते.

सॅन होजे दे एरियल येथे जुगार खेळत असलेल्या २० जणांना अटक

रविवारी दुपारी सॅन होजे दे एरियल येथे जुगार खेळत असलेल्या २० जणांना मायणा कुडतारी पोलिसांनी रंगेहाथ अटक केली. संशयितांकडून ४.४० लाख रुपये, एक टॅब, एक राउटर जप्त करण्यात पोलिसांना यश आले.

सावर्डे ट्रक मालकांची डंप धोरण पुनरुज्जीवित करण्याची मागणी

सावर्डे ट्रक मालकांची डंप धोरण पुनरुज्जीवित करण्याची मागणी, १४ वर्षांपासून खाण बंद असल्याने अडचणीत आलेल्या ट्रकचालकांना मदत करण्याचे सरकारचे आवाहन

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT