Goa News : पिसुर्ले येथे कार्यशाळेचे समई प्रज्वलित करून उद्घाटन करतांना मुख्याध्यापक उल्हास गावकर, बाजूला देवानंद परब, नंदा माजीक व इतर मान्यवर   बि डी मोटे
गोवा

पिसुर्ले माध्यमिक विद्यालयात प्रौढावस्था प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न..!

लैगिक शोषण आणि मुलांची तस्करी या संबंधी तज्ज्ञांनी दिली सविस्तर माहिती..

दैनिक गोमन्तक

पिसुर्ले Goa News : पिसुर्ले येथिल सरकारी माध्यमिक विद्यालयात (secondary school) दि 22 ते 25 नोव्हेंबर पर्यंत प्रौढावस्था प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करून विद्यार्थ्यांना लैंगिक शोषण (Sexual abuse) आणि मुलांची होणारी तस्करी (Child trafficking) या संबंधी सविस्तर माहिती देण्यात आली.

या कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमाला पिसुर्ले पंचायतीचे माजी सरपंच तथा विद्यमान पंच देवानंद परब, विद्यालयाचे मुख्याध्यापक उल्हास गावकर, जेष्ठ शिक्षक नंदा माजीक, या कार्यशाळेच्या संयोजक शिक्षिका कविता पावणे, शाळेची सल्लागार माधवी पाटील, कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेल्या संसाधन वक्त्या लुरिडा पराडो, फरहात जहान खान आदी मान्यवर उपस्थित होते.

या चार दिवशीय कार्यशाळेच्या प्रशिक्षण कार्यक्रमात सामाजिक स्तरावर होणारे मुलांचे लैंगिक शोषण आणि तस्करी, मासिक पाळीची स्वच्छता, किशोरवस्था जीवनातील मानसशास्त्र आणि सामाजिक पैलू, कोव्हीड 19 माहामारीतील मुलांचे मानसिक हीत या संबंधी मुलांना सर्व विषयांचे ज्ञान अवगत व्हावे या अनुषंगाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे मुलांमध्ये जागृक्ता निर्माण होऊन त्याचा आत्मविश्वास वाढण्यास खूप मदत होते. त्याच प्रमाणे स्वताची काळजी कशी घेणे, कोणतीही अडचण समोर आल्यावर मार्ग कसा काढावा या विषयी अशा प्रकारच्या कार्यशाळेच्या माध्यमातून मिळणाऱ्या प्रशिक्षणाने मुले सक्षम बनावी या हेतूने सरकारी माध्यमिक विद्यालय पिसुर्ले यांनी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

समई प्रज्वलित करून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिती गावडे हीने केले, मुख्याध्यापक उल्हास गावकर यांनी स्वागत केले. शेवटी कार्यशाळेच्या संयोजक शिक्षिका कविता पावणे हीने आभार व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sadetod Nayak: काँग्रेस युतीसाठी प्रयत्नशील, आता गोवा फॉरवर्डनेही स्पष्ट भूमिका घेण्याची गरज

Goa Politics: रॉय नाईक यांचा नगरसेवकपदाचा अचानक राजीनामा! फोंड्यापासून मडकईपर्यंत राजकीय चर्चांना उधाण; पुढचा डाव कोणता?

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

SCROLL FOR NEXT