Goa COVID-19 Update Gomantak Digital Team
गोवा

Goa Covid Updates : कोरोना’चा धोका वाढला; नवे 120 रुग्ण

एकूण बाधित 518: अधिकच्या उपचारांसाठी पाचजण रुग्णालयात

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी : राज्यात गेल्या २ आठवड्यापासून वाढणाऱ्या कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. पॉझिटिव्ह रेट १० टक्क्यांच्यावर असून रुग्णालयात भरती होणाऱ्यांची संख्याही अद्याप वाढत आहे. आज ५ रुग्णांना अधिकच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर नवे १२० बाधित सापडले आहेत. यामुळे नागरिकांनी ‘एसओपी’चे पालन करावे, असे आवाहन आरोग्य खात्याच्या वतीने करण्यात आले आहे.

आरोग्य खात्याचे साथीचे रोग विभाग प्रमुख डॉ.प्रशांत सूर्यवंशी म्हणाले आजचाही पॉझिटिव्हिटी रेट १० टक्क्यांच्या वर आहे. उपचारांसाठी भरती होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे ‘एसओपी’चे पालन करणे अनिवार्य बनले आहे. आज कोरोनाच्या नव्या १२० बाधितांसह एकूण बाधितांचा आकडा ५१८ झाला आहे.

आज घेतलेल्या ९८६ संशियतांच्या चाचण्यांपैकी १२० नवे बाधित सापडले. कोरोना मुळे आज मृत्यू नसल्यामुळे बळींचा आकडा ४०१४ कायम आहे. राज्यात आतापर्यंत २,५९,९३३ जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी २,५५,४०१ नागरिक पूर्णतः बरे झाले असून हे बरे होण्याचे प्रमाण ९८.२६ टक्के आहे.

सध्या राज्यातील वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर भीतीचे वातावरण पसरले आहे. दक्षता म्हणून कोरोनाची लक्षणे आढळणाऱ्यांनी जवळच्या आरोग्य केंद्राकडे तसेच डॉक्टरांकडे धाव घेतली असल्याचे आढळून येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT