Goa News|Cemetery Dainik Gomantak
गोवा

Goa News: 'सोनसोडो' कब्रस्थान बांधण्यासाठी नागरिकांचा तीव्र विरोध

सोनसोडो येथे कब्रस्थान उभारण्यासाठी मडगाव नगरपालिका आणि जीसुडा यंत्रणेने रेखांकन करण्याचे काम हाती घेतले आहे.

दैनिक गोमन्तक

Goa News: सोनसोडो येथे कब्रस्थान उभारण्यासाठी मडगाव नगरपालिका आणि जीसुडा यंत्रणेने रेखांकन करण्याचे काम हाती घेतले आहे, पण या कब्रस्थानात जाण्यासाठी वाट कोणती हे स्पष्ट केलेले नाही आणि हे काम सुरू करताना इतर संबंधितांना विश्वासातही घेतले नाही, असा आक्षेप राय आणि बोर्डा येथील लोकांनी घेतला.

या दोन्ही ठिकाणच्या लोकांनी पूर्वी या कब्रस्थानला विरोध केला होता. मात्र, हा विषय उच्च न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने हे काम अग्रक्रमाने हाती घेण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. त्यानंतर काल मडगाव पालिकेच्या अधिकाऱ्यांनी काल या जागेची पाहणी केली होती.

कालपासून रेखांकन करण्याचे काम सुरू होणार होते. मात्र, राय व बोर्डा येथील नागरिक त्या जागेवर उपस्थित झाल्याने हे काम सुरू झालेच नाही.

आमचा या प्रकल्पाला विरोध नाही. मात्र, हे काम सुरू करण्यापूर्वी जी कायदेशीर प्रक्रिया करणे आवश्यक होती, तीच पूर्ण केलेली नाही. याचाच जाब विचारण्यासाठी आम्ही तेथे गेलो होतो, अशी माहिती रायचे पंच सदस्य झेवियर फर्नांडिस यांनी दिली.

ही कब्रस्थानची जागा तीन समाजासाठी देण्यात आली असून सध्या जे काम चालू आहे त्या जागेच्या बाजूची जागा राय चर्चच्या, तर दुसऱ्या बाजूची जागा बोर्डा कपेलच्या मालकीची आहे. रेखांकन सुरू करण्यापूर्वी या दोन्ही संस्थांना नोटीस पाठविण्याची गरज होती, ती पाठविलेली नाही याकडे फर्नांडिस यांनी लक्ष वेधले.

गुपचूप केले रेखांकन

सोनसोडो येथे उभारण्यात येणाऱ्या कब्रस्थानला स्थानिक लोकांकडून होणारा विरोध लक्षात घेऊन आज गुपचूपपणे जीसुडाच्या अधिकाऱ्यांनी रेखांकन करण्याची प्रक्रिया उरकून घेतली.

सोनसोडो प्रकल्पाजवळ लोक उपस्थित झाल्याने हे अधिकारी वेगळ्याच मार्गाने नियोजित कब्रस्थान जागेवर गेले आणि त्यांनी ही प्रक्रिया उरकून घेतली. रेखांकन प्रक्रिया पूर्ण केल्याची माहिती मडगाव पालिका मुख्याधिकाऱ्यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT