Goa News गायीच्या तोंडात फुटला 'गावठी बाँब' Dainik Gomantak
गोवा

गायीच्या तोंडात फुटला 'गावठी बाँब'

रानडुक्कर तसेच इतर रानटी श्‍वापदे ठार मारण्यासाठी गावठी बाँबचा वापर केला जात असल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे.

Shreya Dewalkar

फोंडा: (Goa News) कवळे परिसरातील डोंगराळ भागात एक गाय (Cow) जखमी झाल्याचे निदर्शनास आल्याने प्राणीमित्रांनी या प्रकाराची दखल घेऊन तिची रवानगी गुरांवर उपचार करणाऱ्या संस्थेकडे केली. या गायीचे तोंड फाटल्याने जिभेलाही जखम झाली होती. डोंगराळ भागात चरत असताना गावठी बाँब (Bomb) या गायीच्या तोंडात जाऊन तो फुटल्याने ती जखमी झाली असावी, असा कयास प्राणीमित्रांनी व्यक्त केला आहे.

कवळेत ही गाय जखमी झाल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी प्राणीमित्रांना कळवले. येथील प्राणीमित्र संकेत नार्वेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लगेच धाव घेऊन या जखमी गाईला जांबावली येथील ध्यान फाऊंडेशनमध्ये उपचारासाठी पाठवले. तेथे तिच्यावर लगेच उपचार सुरू करण्यात आले.

दरम्यान, कवळे तसेच इतर ठिकाणच्या डोंगराळ भागात रानडुक्कर तसेच इतर रानटी श्‍वापदे ठार मारण्यासाठी गावठी बाँबचा वापर केला जात असल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. संबंधित सरकारी यंत्रणेने या प्रकाराची त्वरित दखल घेऊन असे प्रकार टाळावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT