Goa News : विठ्ठलापूर-कारापूर भागात राबविण्यात आलेले अभियान..
Goa News : विठ्ठलापूर-कारापूर भागात राबविण्यात आलेले अभियान..  Dainik Gomantak
गोवा

'भाजपला' सत्तेपासून दूर लोटा; दिनेश गुंडू राव

दैनिक गोमन्तक

डिचोली Goa News: मये मतदारसंघात काँग्रेसचे (Congress) 'म्हारगायेचो जागोर' अभियान जोरात सुरु असून,आज (रविवारी) मतदारसंघातील विठ्ठलापूर-कारापूर भागात हे अभियान राबविण्यात आले.

काँग्रेसचे गोव्याचे प्रभारी दिनेश गुंडू राव यांच्या उपस्थितीत भाजप (BJP) सरकार विरोधात घोषणा देत, विठ्ठलापूर येथील श्री पांडुरंग मंदिराकडून या अभियानला प्रारंभ झाला. यावेळी काँग्रेसचे उत्तर गोवा जिल्हा अध्यक्ष विजय भिके, मये मतदारसंघाचे प्रभारी अनंत पिसूर्लेकर, मयेतील संभाव्य उमेदवार ऍड. अजय प्रभुगावकर,पिळगावचे माजी सरपंच आणि प्रदेश समितीचे दिलीप गावस, मये गट काँग्रेसचे अध्यक्ष राजेश गावकर, काँग्रेसचे कार्यकर्ते मेघ:श्याम राऊत, पिळगावचे माजी सरपंच बाबाजी गावकर, विनोद धुरी आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

या कार्यकर्त्यांनी घरोघरी भेट देऊण भाजप सरकारचे अपयश आणि वाढत्या महागाईबाबत जनजागृती केली. नागरिकांना पत्रके वितरीत करतानाच, येत्या निवडणुकीत काँग्रेसला साथ द्या. असे आवाहन केले.

भाजपमुळे देश संकटात

भाजप सरकारच्या कार्यकाळात महागाईने कळस गाठला आहे. जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढवून या सरकारने सर्वसामान्य जनतेला जीणेच असह्य केले आहे. देशाची आर्थिक स्थितीही कमकुवत झाली असून, देश संकटात आहे. अशावेळी भाजपला सत्तेपासून दूर करणे हाच पर्याय जनतेसमोर आहे. असे दिनेश गुंडू राव यांनी सांगून, काँग्रेसला सत्तेवर आणावे. असे आवाहन केले. काँग्रेसच्या अभियानला मिळत असलेला प्रतिसाद पाहता मये मतदारसंघात काँग्रेसचा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला. विजय भिके आणि ऍड. अजय प्रभुगावकर यांनी यावेळी बोलताना भाजप सरकारने सर्व बाजूनी जनतेला वेठीस धरले आहे. अशी टीका केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

Goa Loksabha Voting: उरले दोन तास! गोव्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

‘’दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी सेलिब्रिटी अन् सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तितकेच जबाबदार’’, पतंजली प्रकरणात SC ची कठोर टिप्पणी

Goa Eco-Friendly Booth Video: गोव्यातील इको-फ्रेन्डली मतदान केंद्राची चर्चा; व्हिडिओ, फोटो व्हायरल

High Court Order: वृद्ध सासूसोबत राहण्यास पत्नीचा नकार; उच्च न्यायालयाने दिला घटस्फोटाचा आदेश

SCROLL FOR NEXT