Fish Festival Dainik Gomantak
गोवा

Fish Festival: ॲक्वा गोवा मेगा फिश फेस्टिव्हल 10 फेब्रुवारीपासून

ॲक्वा गोवा मेगा फिश फेस्टिव्हल 10 ते 12 फेब्रुवारी या कालावधीत आयोजित केला असल्याची माहिती मत्स्य व्यवसाय मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी दिली.

दैनिक गोमन्तक

Fish Festival: राज्यात मत्स्य विभागाच्या वतीने आयोजित केला जाणारा ॲक्वा गोवा मेगा फिश फेस्टिव्हल 10 ते 12 फेब्रुवारी या कालावधीत आयोजित केला असल्याची माहिती मत्स्य व्यवसाय मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी दिली. सचिवालयातील पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.

यावेळी हळर्णकर म्हणाले की, मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी आणि राज्यातील मासळीची मागणी पूर्ण करण्यासाठी गोड्या पाण्यातील मासेमारीला प्रोत्साहन देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

तांत्रिक पद्धतीने पिंजरा संवर्धनाद्वारे गोड्या पाण्यातील मासेमारी करण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे. जलाशयातील मत्स्य व्यवसाय विकासाचा मुख्य आधार स्टॉकिंग फिंगरलिंग्स आहे, ज्यामुळे शाश्वत आधारावर मत्स्य उत्पादन सुलभ होईल.

मनोरंजनाचा खजिना

ॲक्वा गोवा मेगा फिश फेस्टिव्हलचे आयोजन 10 ते 12 फेब्रुवारीदरम्यान कांपाल येथील साग मैदानावर होणार आहे.

तीन दिवसांच्या या विशेष कार्यक्रमात मत्स्यालय फिश गॅलरी, व्यावसायिक स्टॉल, फिश पॉन्ड, विविध स्पर्धा, मनोरंजन कार्यक्रम आणि चर्चासत्र होईल. मच्छीमार क्षेत्रात मजबूत अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी भागधारकांना एकत्र येण्यासाठी हा महोत्सव आयोजिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT