New Year Celebration on Goa Beach party  Dainik Gomantak
गोवा

New Year : मावळत्या वर्षाला सुरू झालेल्या संगीत पार्ट्या नूतन वर्षातही सुरू

गोमन्तक डिजिटल टीम

New Year : मोरजी, गोव्‍यात मोठ्या संख्‍येने आलेल्‍या देशी पर्यटकांमुळे ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली. रात्री बारा वाजता दारूकामाची आतषबाजी करण्‍यात आली.

त्‍यावर लाखो रुपयांची उलाढाल करण्यात आली. पैशाचा धूर आणि प्रदूषणाचा मारा सहन करावा लागला. त्यास साथ मिळाली ती कर्णकर्कश संगीताची.

मावळत्या वर्षाला सुरू झालेल्या पार्ट्या नवीन वर्षाच्‍या पहाटेपर्यंत सुरूच होत्या. ‘दम मारो दम’प्रमाणे बहुतांश पर्यटक संगीत रजनी पार्ट्यांमध्‍ये डिजेच्या समोर हातात ग्लास घेऊन, नाका-तोंडातून धूर काढत झिंगत होते.

पोलिस दुचाकीने किनाऱ्यावर फिरत होते, पण नियम धाब्‍यावर बसविणाऱ्यांवर कारवाई करण्‍यास कमी पडत होते. विशेष म्‍हणजे किनारी भागात वाळूत वाहने चालवण्‍यास निर्बंध असताना पोलिस मात्र वाहने घेऊन फिरत होते.

रात्री १२ नंतर पोलिस गायब:

संवेदनशील किनारी भागात रात्री १२ नंतर ज्या पार्ट्या सुरू होत्या, तेथून पोलिसांनी काढता पाय घेतला होता. काही ठिकाणी पोलिस होते, पण त्‍यांनी ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी प्रयत्नच केले नाहीत. त्यामुळे आयोजकांचे आयतेच फावले.

मावळत्या वर्षात ध्वनिप्रदूषण रोखण्‍यास सरकारी यंत्रणेला यश मिळाले नाही, ते त्यांना नवीन वर्षात कसे मिळणार? असा सवाल उपस्‍थित केला जात आहे. पेडणे पोलिसांनी तर अशा प्रकारचा एकही गुन्हा नोंद केलेला नाही.

मार्बेला रिसॉर्टवर अंधाराचे साम्राज्य

दरवर्षी गावडेवाडा-मोरजी किनारी भागात मार्बेला रिसॉर्टवर जंगी पार्ट्यांचे आयोजन केले जायचे. परंतु यंदा या रिसॉर्टवर अंधाराचे साम्राज्य पसरले होते. कोट्यवधी रुपये देऊन आंतरराष्ट्रीय दर्जाचे डिजेवादक आणले जायचे.

सनबर्न आफ्टर पार्टी या रिसॉर्टवर व्हायची. यंदा मात्र एकही पार्टी तेथे झालेली नाही. निदान मावळत्या वर्षाला तरी ते सुरू होईल अशी नागरिकांची अपेक्षा होती. परंतु ती फोल ठरली. इतर रिसॉर्टवर चकाचक विद्युत रोषणाई केली होती.

देशी पर्यटकांची संख्‍या खूप मोठी होती. एरवी रिसॉर्टमध्ये १० जानेवारीपर्यंत हॉटेल्‍स रुम्‍स, हट्स, कॉटेज्‌स आगाऊ रक्कम देऊन आरक्षित केले जायच्‍या. पण यंदा तसे नाही. त्‍यामुळे व्‍यावसायिकांना आर्थिक फटका बसलाच.

- हरी म्हामल, ‘लाकबाना‘ रिसॉर्टचे व्यवस्थापक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खून प्रकरणातील आरोपीला भावाच्या लग्नासाठी सात दिवसांसाठी जामीन, रुमडामळमध्ये तणाव शक्य

Bicholim: पोलिस बंदोबस्तात पिराचीकोंड येथील बेकायदा झोपडपट्टी जमीनदोस्त, परिसरात तणाव

6.80 लाखांचे अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी छत्तीसगडच्या महिलेला अटक, म्हापशात भेसळयुक्त 200 KG बडीशेप जप्त; गोव्यातील ठळक बातम्या

दक्षिण गोव्यात Swiggy डिलिव्हरी बाईज् संपावर, काय आहेत प्रमुख मागण्या?

Goa Congress: दरमहा सात हजार! पगार की शिक्षा? शिक्षकांना देण्यासाठी भाजप सरकारकडे नाहीत पैसे; काँग्रेस

SCROLL FOR NEXT