नव्याने गोव्यात राजकारण करु पाहणारे पक्ष केवळ धर्मनिरपेक्ष मतांमध्ये फूट (Divide into secular votes) घालणार आहेत.  Dainik Gomantak
गोवा

Goa: नवे राजकीय पक्ष धर्मनिरपेक्ष मतात फूट पाडणारे

गोमंतकीय पं. नेहरूंचे "अजीब है गोवा के लोग" हे शब्द खरे ठरवतील, येणाऱ्या दिवसांत गोव्यात "कॉंग्रेस लाट" सर्वत्र दिसणार आहे. असा दावा चोडणकर (Girish Chodankar) व कामत (Digambar Kamat) यांनी या पत्रकातून केला आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: कॉंग्रेस पक्षाने (Congress party) गोव्याची (Goa) अस्तिमा नेहमीच जपली आहे. गोमंतकीयांच्या संवेदना जाणणारा व भावनांचा आदर करणारा पक्ष म्हणुन गोमंतकीयांनी नेहमीच कॉंग्रेस पक्षावरच विश्वास ठेवला आहे. आता नव्याने गोव्यात राजकारण करु पाहणारे पक्ष केवळ धर्मनिरपेक्ष मतांमध्ये फूट (Divide into secular votes) घालणार आहेत. गोमंतकीय जनता राजकीय जुगार व करामतींना बळी पडणार नसून, गोव्याची अस्मिता राखण्यासाठी ते पंडित नेहरूंचे "अजीब है गोवा के लोग" हे शब्द परत एकदा खरे ठरवून कॉंग्रेसला विजयी करणार आहेत. असा दावा गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar) व विधीमंडळ गट नेते दिगंबर कामत (Digambar Kamat) यांनी आज जारी केलेल्या संयुक्त पत्रकातून केला आहे. काही पक्ष हे निवडणुकांसाठी येत असून भाजप विरोधी धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी करण्याच्या कुटील डावांना गोवेकर कदापी बळी पडणार नाहीत.

उलट 2022 मध्ये कॉंग्रेस पक्ष सत्ता स्थापन करणार असून, गोमंतकीयांचा विरोध असलेले भाजप सरकारचे सर्व प्रकल्प व निर्णय आम्ही रद्द करणार आहोत. असेही या पत्रकात म्हटले आहे. कॉंग्रेस पक्षात प्रवेश करण्यासाठी आज युवकांची रांग लागली असुन, जातीयवादी, असंवेदनशील व बेजबाबदार भाजपला पराभूत करणे केवळ कॉंग्रेसला शक्य असल्याचे आज प्रत्येक गोमंतकीयांना कळून चुकले आहे. येणाऱ्या दिवसांत गोव्यात "कॉंग्रेस लाट" सर्वत्र दिसणार आहे. असा दावा चोडणकर व कामत यांनी या पत्रकातून केला आहे.

गोव्याला कुणीही ग्राह्य धरू नये. आता परत एकदा गोव्यात बस्तान मांडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी यापुर्वी दोनदा असे प्रयोग करुन पराभव चाखले आहेत व यापुढे त्यांना पराभवच पहावा लागेल. असेही गोव्यात तृणमूल कॉंग्रेस विधानसभा निवडणुका लढविणार असल्याच्या त्यांच्या नेत्यांनी केलेल्या घोषणेवर प्रतिक्रीया देताना चोडणकर यांनी म्हटले आहे. ममता दिदी या गोव्यात धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी करण्याचा मुर्खपणा करुन तृणमूलचे प्रथम विरोधक भाजपला फायदा मिळवून देण्याचा प्रयत्न करणार नाहीत. गोव्यात राजकीय आत्महत्या करण्याचा निर्णय त्या घेणार नाहीत" असे मतही चोडणकर यांनी या पत्रकातून व्यक्त केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT