जुझे फिलिप डिसोझा यांची राष्ट्रवादीच्या गोव्याचे प्रदेश अध्यक्ष पदी निवड झाली आहे. Dainik Gomantak
गोवा

Goa: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा दाबोळीतून लढण्याची शक्यता

सध्या दाबोळी मतदारसंघाचे पंचायतमंत्री माविन गुदिन्हो हे आमदार असून डिसोझा हे या मतदारसंघातून निवडणूक वाढविल्यास त्याना तुल्यबळ टक्कर मिळू शकते.

दैनिक गोमन्तक

मडगाव: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) गोव्याचे प्रदेश अध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा (Juze Philip D'Souza) यांनी येणारी निवडणूक आपण दाबोळी (Daboli) मतदारसंघातून लढविण्याचे संकेत दिले आहेत. यापूर्वी डिसोझा दोनवेळा वास्को (Vasco) मतदारसंघातून निवडून आले होते तर दोनवेळा त्यांचा याच मतदारसंघात पराभवही झाला होता.

आपण मतदारांच्या संपर्कात असून यासंदर्भात लवकरच निर्णय घेणार असे डिसोझा यांनी सांगितले. दाबोळीतील कित्येक मतदार आपल्या संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले.

सध्या दाबोळी मतदारसंघाचे पंचायतमंत्री माविन गुदिन्हो हे आमदार असून डिसोझा हे या मतदारसंघातून निवडणूक वाढविल्यास त्याना तुल्यबळ टक्कर मिळू शकते.

या संदर्भात बोलताना डिसोझा म्हणाले, 1989 पासून मी वास्को मतदारसंघातून निवडणूक लढविली आहे. आज जो दाबोळी मतदारसंघ आहे त्याचा 60 टक्के भाग पूर्वीच्या वास्को मतदारसंघात मोडत असून या मतदारसंघात माझे कित्येक समर्थक आणि हितचिंतक अजूनही आहेत असे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT