37th National Games Goa Dainik Gomantak
गोवा

37th National Games Goa: स्पर्धेवर परतीच्या पावसाचे सावट, पण क्रीडामंत्री म्हणतात, ''भिवपाची गरज ना, कारण...''

क्रीडामंत्री गावडे: कांपाल येथील नियोजित क्रीडानगरीत पाण्याचा निचरा करण्यासाठी सज्जता

किशोर पेटकर

37th National Games Goa: परतीचा पाऊस सध्या गोव्याला झोडपत आहे. 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या सुरवातीच्या काळात वरुणराजाचे सावट राहू शकते. त्यामुळे या मैदानावर पाणी साचून बेरंग होऊ शकतो, पण आता क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी त्यावर उपाययोजना जाहीर केली असून साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याचे सांगितले.

क्रीडामंत्री गावडे म्हणाले, ‘‘कांपाल येथे 20 ऑक्टोबरपर्यंत जर्मन हँगर्स तंत्रज्ञान वापरून भव्य तंबू उभारले जातील. या ठिकाणीच क्रीडानगरी असेल. काम वेळेत पूर्ण होण्यासाठी तांत्रिक अधिकारी देखील मेहनत घेत आहेत.

परतीचा जोरदार पाऊस आल्यास क्रीडानगरीच्या ठिकाणी पाणी साचू नये यासाठी दक्षता घेण्यात आली आहे. पाण्याचा योग्य निचरा व्हावा यासाठी उपाययोजना असेल. योग्य ठिकाणी खड्डे खोदले जातील. पाणी खेचून घेण्यासाठी पंप्स देखील तयार असतील.’’

क्रीडानगरीत सांस्कृतिक केंद्र

कांपाल येथील क्रीडानगरीत सांस्कृतिक केंद्र असेल, येथे मनोरंजनात्मक कार्यक्रम होतील. क्रीडानगरीतील व्यासपीठ पुरेशा उंचीवर असेल. सुरक्षेसाठी, वाहतुकीचे नियोजन, वाहतुकीचा अंदाज घेण्यासह आदीबाबींसाठी आम्ही पोलिसांसोबत महत्त्वाची बैठक घेतली आहे.

त्यासाठी दोन नियंत्रण कक्ष देखील कार्यरत असतील असतील. क्रीडा स्पर्धेशी निगडित प्रत्येक वाहनावर जीपीएस बसवण्याची आमची योजना आहे.

कार्यक्रमस्थळी ये-जा करण्यासाठी वेगवेगळी वाहने असतील, तर खेळाडूंच्या कार्यक्रमस्थळापासून राहण्याच्या ठिकाणी जाण्यासाठी विशेष वाहने असतील, अशी माहिती गावडे यांनी यावेळी दिली.

खेळाडू उद्यापासून राज्यात

37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पहिली स्पर्धा 19 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. त्यानिमित्त मंगळवारपासून सहभागी खेळाडू गोव्यात येण्यास सुरवात होईल. बॅडमिंटनमधील सांघिक स्पर्धेत पुरुष गटात कर्नाटक, उत्तराखंड, महाराष्ट्र, दिल्ली, आसामा व यजमान गोवा हे संघ, तर महिल गटात आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, पंजाब, आसाम व यजमान गोव्याचा समावेश आहे.

एकंदरीत नऊ नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत 43 खेळांचा समावेश असून सर्व खेळांत मिळून दहा हजाराहून जास्त खेळाडूंचा सहभाग अपेक्षित आहे. खेळाडूंच्या निवासाची व्यवस्थाप चोख राहील असेही त्यांनी नमूद केले.

‘‘राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कांपाल महत्त्वाचे केंद्र आहे. याठिकाणी १३ ते १४ खेळ होणार आहेत. त्यामुळे या ठिकाणी कामात त्रुटी राहू नये यासाठी मी खास पाहणी करत असून तयारीवर लक्ष ठेवून आहे.’’

- गोविंद गावडे, क्रीडामंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bhagwan Mahavir: धुक्यात हरवलेले जंगल, फेसाळणारा दूधसागर आणि वन्यजीवांचा थरार; पावसात नक्की भेट द्या गोव्याच्या 'या' अभयारण्याला

डिचोली बाजारात वीजवाहिन्यांचा धोका; 'स्पार्क'मुळे व्यापारी भयभीत, तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

Goa Sports Complex: कांपाल क्रीडा, व्यापारी सुविधा भाडेपट्टीवर; खासगी संस्थेमार्फत चालविण्याचा राज्य सरकारचा निर्णय

Goa Athletics Championship: राज्यस्तरीय ॲथलेटिक्सला मोठा प्रतिसाद; मनोहर पर्रीकर स्मृती स्पर्धेत 2 हजार ॲथलीट्सचा सहभाग अपेक्षित

VIDEO: शोएब अख्तरच्या भावाच्या अंत्यविधीत दहशतवाद्यांची एन्ट्री; पाकिस्तानचा खरा चेहरा उघड! व्हिडिओ चर्चेत

SCROLL FOR NEXT