Naksha Land Survey Scheme Dainik Gomantak
गोवा

Naksha Land Survey Scheme: 'नक्शा जमीन सर्वेक्षण' योजनेच्या प्रक्रियेला मिळतोय अल्प प्रतिसाद; मडगावातून 153, तर कुंकळ्ळीतून 83 जणांनी सादर केली कागदपत्रे

Goa Naksha Land Survey Scheme: केंद्र सरकारच्या नक्शा जमीन सर्वेक्षण योजनेअंतर्गत जमीन किंवा घरमालकांनी मालकीहक्काची कागदपत्रे सादर करण्याची प्रक्रिया १६ जुलैपासून सुरू झाली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

सासष्टी: केंद्र सरकारच्या नक्शा जमीन सर्वेक्षण योजनेअंतर्गत जमीन किंवा घरमालकांनी मालकीहक्काची कागदपत्रे सादर करण्याची प्रक्रिया १६ जुलैपासून सुरू झाली आहे. मात्र, मडगाव कचेरीत मडगाव व कुंकळ्ळी येथून अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. आतापर्यंत केवळ २३६ जणांनी आपली कागदपत्रे सादर केली आहेत, असे समजते. १४ ऑगस्टपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे.

मडगाव कचेरीत दोन कर्मचाऱ्यांवर कागदपत्रे स्वीकारण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांना या बाबतीत काही प्रश्न विचारले असता त्यांच्याकडे उत्तर नसते. त्यांचे काम केवळ कागदपत्रे स्वीकारणे एवढेच असल्याचे जाणवते, असे माजी सनदी अधिकारी एल्विस गोम्स यांनी सांगितले.

जमीन सर्वेक्षण कचेरी एरव्ही माथानी साल्ढाना प्रशासकीय इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आहे. मात्र, कागदपत्रे स्वीकारण्यासाठी एसजीपीडीए मार्केटजवळील ओशिया इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील खात्याच्या जुन्या कचेरीत व्यवस्था करण्यात आली आहे.

काही लोकांना याची माहिती नसल्याने ते माथानी साल्ढाना प्रशासकीय इमारतीत जातात व नंतर त्यांना ओशिया कचेरीत पाठवले जाते. ही कागदपत्रे जास्त करून ज्येष्ठ नागरिक घेऊन येतात. त्यामुळे त्यांना नाहक त्रास सोसावा लागतो.

कुंकळ्ळीत सोय करण्याची मागणी

मडगावातून १५३ व कुंकळ्ळीतून ८३ मालकांनी कागदपत्रे सादर केल्याची नोंद झाली आहे. पुढील काही दिवसांत जास्तीत जास्त मालक कागदपत्रे सादर करतील, अशी शक्यता अधिकारी व्यक्त करत आहेत.

कुंकळ्ळीतील लोकांना आपली कागदपत्रे कुंकळ्ळी नगरपालिका कचेरीत सादर करण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी आहे. आम्ही त्यांच्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचविल्या आहेत, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Mobile Tower: ...तर तीव्र आंदोलन छेडणार, कोलवाळ येथे प्रस्तावित मोबाईल टॉवरला स्थानिकांचा तीव्र विरोध; ग्रामस्थ एकवटले

Aamir Khan Threat: सलमाननंतर आमिर खानला जीवे मारण्याची धमकी, सोशल मीडिया पोस्टमुळे खळबळ; बिश्नोई गँगचे नाव समोर

'Goa Bird Checklist'मध्ये नव्या प्रजातींची नोंद; पाच नव्या पक्ष्यांचा समावेश, इंडियन बड्‌र्सच्या शोधपत्रिकेतील अहवाल प्रसिद्ध

वेळेवर पाऊस पडू दे, पीक उत्तम येऊ दे; पावसासाठी शेतकऱ्यांचे साकडे! हळदोणे ग्रामस्थांकडून विशेष प्रार्थना पायी वारी

POK Violence: पाकव्याप्त काश्मीरमध्ये रक्ताचा सडा! संयुक्त राष्ट्रांचे मानवाधिकार प्रमुख थेट मैदानात; पाकड्यांचं पाप जगाच्या वेशीवर VIDEO

SCROLL FOR NEXT