Davorlim Murder Case Dainik Gomantak
गोवा

Davorlim Murder Case: पूर्ववैमनस्यातून खून? दवर्लीत धारदार शस्त्राने हल्ला करत आरोपी फरार

गेल्या तीन दिवसातील चौथा खून; मायणा-कुडतरी पोलीस घटनास्थळी दाखल

Kavya Powar

Goa Murder Case: राज्यात मागील काही दिवसांपासून खुनाच्या काही घटना समोर आल्या आहेत. अशीच एक घटना दवर्लीमध्ये घडली आहे.

दवर्ली हाऊसिंग बोर्डमध्ये सादिक बेल्लारी नामक व्यक्तीचा खून झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मायणा-कुडतरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

पूर्ववैमनस्यातून खून झाल्याचा अंदाज...

माहितीनुसार, 2020 मध्ये मुझाहिद खानच्या हत्येप्रकरणी मायणा-कुडतरी पोलिसांनी सादिक बेल्लारीला अटक केली होती. यानंतर हल्लीच 3 महिन्यांपूर्वी त्याची जामिनावर सुटका करण्यात आली होती. मात्र सादिक विरोधी गटाच्या रडारवर होता. अनेकदा विरोधी गटाकडून त्याला धमकावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

सादिकच्या शेवटच्या सुनावणीवेळीही विरोधी गटाकडून त्याला धमकावण्यात आले होते. त्यावेळी याबाबत त्याने फातोर्डा पोलिसांत तक्रारही दाखल केली होती.

आज सादिकचे आई-बाबा बाहेर गेले तेव्हा सादिक एकटाच घरी होता. त्यावेळी अज्ञातांनी घरात घुसत सादिकवर हल्ला केला आणि धारधार शस्त्राने त्याचा गळा कापला. हा हल्ला इतका अनपेक्षित होता की सादिकला स्वत:चा बचाव करण्यासाठी वेळच मिळाला नाही.

पोलीस सध्या सीसीटीव्ही तपासून आरोपींचा शोध घेत आहेत. दरम्यान, सादिकच्या घराबाहेर लोकांनी गर्दी केली असून सर्वजणच या घटनेमुळे घाबरून गेले आहेत. सासष्टी पोलिस उपअधीक्षक संतोष देसाई हे या घटनेकहा पुढील तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT